Viral video : सोशल मीडियावर दररोज अनेक गोष्टी व्हायरल होतात. काही व्हिडीओ तर इतके भयानक असतात की पाहून अंगावर काटा येतो. सध्या असाच एक व्हिडीओ समोर आला आहे. या व्हिडीओमध्ये तुम्हाला दिसेल की आईचे मुलाकडे लक्ष नसल्यामुळे पुढे त्या मुलाबरोबर जे घडते, ते पाहून कोणालाही धक्का बसेल. नेमकं काय घडतं, हे जाणून घेण्यासाठी तुम्हाला व्हिडीओ पाहावा लागेल.
या व्हायरल व्हिडीओमध्ये तुम्हाला दिसेल की आई तिच्या चिमुकल्याला घेऊन लिफ्टमध्ये उभी आहे. आईचे लक्ष फोनध्ये असते. आई फोनमध्ये व्यस्त असताना मुलगा लिफ्टमध्ये खेळत असतो. लिफ्टच्या दरवाज्यावर हात ठेवून तो उभा असतो. जेव्हा त्यांचा फ्लोअर येतो तेव्हा आई तिच्या मुलाजवळ येते पण तिचे लक्ष फोनमध्येच असते. लिफ्टचा दरवाजा उघडतो पण पुढे जे काही घडते, ते अत्यंत धक्कादायक आहे. त्या चिमुकल्याचा एक हात लिफ्टच्या दरवाज्यात अडकतो. हे पाहून आई घाबरते. पुढे व्हिडीओत तुम्हाला दिसते की आई चिमुकल्याचा हात बाहेर काढायचा खूप प्रयत्न करते आणि येथेच हा व्हिडीओ संपतो. हा व्हिडीओ नेमका कुठला आहे, याविषयी अद्याप माहिती समोर आलेली नाही.
व्हायरल व्हिडीओ (Viral video )
nashikupdates_24 या इन्स्टाग्राम अकाउंटवरून हा व्हिडीओ शेअर करण्यात आला असून या व्हिडीओवर लिहिलेय, “आई मोबाईलमध्ये मग्न, बाळाबरोबर झाली घटना” या व्हिडीओवर अनेक युजर्सनी प्रतिक्रिया दिल्या आहेत. एका युजरने लिहिलेय, “कॉमनसेन्स वापरला असता तर २ मिनिटात बाळाचा हात निघाला असता.. लिफ्टला सेन्सर असतो. आत मध्ये येऊन बटन दाबलं असतं तर दरवाजा बंद झाला असता.. आणि बाळाचा हात निघाला असता.” तर एका युजरने लिहिलेय, “आपलं मुल जर मस्ती खोर असेल तर निदान जिथे मुलांवर लक्ष द्यायला लागतं तिथं द्यायचं , मोबाईल बघ्याची काय गरज आहे” आणखी एका युजरने लिहिलेय, “मोबाईल मधून जरा डोळे बाहेर काढा मग लक्ष राहील” एक युजर लिहितो, “बाई ची चुकी आहे बाळाला काय कळते तो लहान आहे” तर एक युजर लिहितो, “सर्व चूक या मोबाईलची आहे, मोबाईलसमोर माणसांना काहीही सुचत नाही” अनेक युजर्सनी या चिमुकल्याच्या आईवर जोरदार टीका केली आहे.