Viral Video : सोशल मीडियावर दररोज नवनवीन ट्रेंड येत असतात. असाच एक ट्रेंड सध्या खूप चर्चेत आहे. एखादा तरुणी किंवा एखादी तरुण हातात पाटी घेऊन रस्त्यावर उभे असतात आणि त्या पाटीवर कधी मजेशीर तर कधी भावुक करणारा संदेश लिहिलेला असतो. रस्त्यावरील लोक त्या पाटीवरील संदेश वाचून बोलक्या प्रतिक्रिया देतात आणि त्या प्रतिक्रिया कॅमेऱ्यात टिपल्या जातात. सोशल मीडियावर तुम्ही असे अनेक व्हिडीओ पाहिले असेल. सध्या असाच एक व्हिडीओ समोर आला आहे या व्हिडीओमध्ये एका तरुणाने पाटीवर खास मित्रासाठी मेसेज लिहिलाय. त्याने नेमके काय लिहिले असेल, असा जर प्रश्न तुम्हाला पडला असेल तर व्हिडीओ नक्की पाहा.
“..मित्र निवडताना वाघ कधी चुकला नाही”
या व्हायरल व्हिडीओमध्ये तुम्हाला एक तरुण दिसेल. तो हातात पाटी घेऊन उभा आहे. या पाटीवर त्याने वाघासारख्या मित्रासाठी लिहिलेय, “वाघानेआयुष्यात सगळे निर्णय चुकीचे घेतले आहेत पण मित्र निवडताना वाघ कधी चुकला नाही. #शेअर करा तुमच्या वाघाला” प्रत्येकाच्या आयुष्यात मित्राचे स्थान हे अत्यंत मोलाचे असते.
पाटीवरील हा संदेश वाचून रस्त्यावरून येणारे जाणारे लोक सहमती दर्शवत आहे. काही लोक एकदम बरोबर म्हणताना दिसत आहे. शाळा कॉलेजातील मुले मुली, तरुण मंडळीपासून वृद्धांपर्यंत सर्वच यावर प्रतिक्रिया देताना दिसत आहे.
पाहा व्हायरल व्हिडीओ (Video Viral)
posterwala_ganyaa या इन्स्टाग्राम अकाउंटवरून हा व्हिडीओ शेअर करण्यात आला असून या व्हिडीओच्या कॅप्शनमध्ये लिहिलेय, “टॅग करा तुमच्या वाघासारख्या मित्राला” या व्हिडीओवर अनेक युजर्सनी प्रतिक्रिया दिल्या आहेत. एका युजरने लिहिलेय, “वाघाचा विषय लय हार्ड आहे हो” तर एका युजरने लिहिलेय, “वाह एकनंबर” आणखी एका युजरने लिहिलेय, “मित्र वनव्यामध्ये गारव्यासारखा” एक युजर लिहितो, “आयु्ष्यात मित्रांची जागा कोणीही घेऊ शकत नाही” तर एक युजर लिहितो, “लाख मित्र बनवा, पण एक मित्र असा असतो, जो आपली साथ सोडत नाही. त्याला मनापासून जपा” अनेक युजर्सनी या व्हिडीओवर हार्टचे इमोजी शेअर केले आहेत.