आर्थिक संकट आणि अंतर्गत कलह यांमुळे पाकिस्तानातील राजकीय नेते परस्परांवर चिखलफेक करत आहेत. सध्या पाकिस्तानात निवडून आलेले सरकार नाही. शाहबाज सरकारचा कार्यकाळ संपल्यानंतर तेथे कार्यकारी सरकार कार्यरत आहे. निवडणूक आयोगाने पुढच्या वर्षी जानेवारीत निवडणुका घेण्याचे सांगितले तेव्हा इम्रान खानच्या पक्षाने त्याला विरोध सुरू केला.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

एकमेकांना लाथा-बुक्क्यांनी मारहाण

दरम्यान, पाकिस्तानच्या एका टीव्ही चॅनलमध्ये इम्रान खान यांचा पक्ष पीटीआय आणि शहबाज शरीफ यांचा पक्ष पीएमएलएन या नेत्यांमध्ये लाईव्ह शोदरम्यान दोरदार वाद झाला. एवढच नाहीतर लाईव्ह शो सुरु असातानाच दोघांनाही एकमेकांना लाथा-बुक्क्यांनी मारहाण केली. हा व्हिडीओ सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत असून सध्या पाकिस्तानच्या राजकारणात अशाच काही आश्‍चर्यकारक गोष्टी पाहायला मिळत आहेत.

नक्की झालं काय?

झालं असं की पाकिस्तान मुस्लीम लीग-नवाज (पीएमएल-एन) सिनेटर अफनान उल्लाह खान आणि पाकिस्तान तहरीक-ए-इन्साफ (पीटीआय) नेते आणि वकील शेर अफझल खान मारवत हे पाकिस्तानी अँकर जावेद चौधरी यांच्या एक्सप्रेस न्यूज टॉक शोमध्ये चर्चेत सहभागी झाले होते. तिथे एका मुद्द्यावर अचानक वादविवाद सुरू असताना अचानक दोघांमध्ये शाब्दिक चकमक झाली. काही वेळातच वादाचं रुपांतर हाणामारीमध्ये झालं. यादरम्यान दोन्ही नेत्यांना एकमेकांना लाथा-बुक्क्यांनी मारहाण केली

शिवीगाळ केल्यावर दोघांमध्ये भांडण

लाइव्ह शोदरम्यान अफनान उल्लाह खानने माजी पंतप्रधान इम्रान खान यांना शिवीगाळ केल्यावर दोघांमध्ये भांडण सुरू झाले. इम्रान खान यांना कथित शिवीगाळामुळे संतप्त झालेला अफजल खान मारवत लाइव्ह शोदरम्यान त्यांच्या जागेवरून उठले आणि अफनान उल्ला यांच्यावर जोरदार हल्ला चढवला.

पाहा व्हिडीओ

हेही वाचा >> कोणतंही काम छोटं नसतं! एकेकाळी पेपर टाकणारा न्हावी कसा झाला ४०० गाड्यांचा मालक?, वाचा यशामागील संघर्ष कहाणी

पीटीआय नेते शेर अफझल खान मारवत यांनी आरोप केला आहे की, अफनान उल्लाह खान यांनी तुरुंगात असलेल्या इम्रान खान यांच्याविरोधात अपमानास्पद भाषा वापरली. दोघांमध्ये झालेल्या हाणामारीनंतर चॅनेलच्या कर्मचाऱ्यांनी हस्तक्षेप करत भांडण सोडवलं. मात्र त्याआधी दोघांनी एकमेकांना अक्षरश: लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. सध्या हा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. नेटकरीही यावर प्रतिक्रिया देत आहेत, “म्हणूनच जग यांना शिव्या घालतं” अशीही कमेंट एका युजरने केली आहे तर त्याला प्रत्युत्तर देत दुसऱ्या युजरने “बरोबर: म्हणत दुजोरा दिलाय.

मराठीतील सर्व ट्रेंडिंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Video of fight between sherafzalmarwat and dr affan during javed ch program on express news video viral srk
First published on: 29-09-2023 at 11:26 IST