Viral Video : सोशल मीडियावर पुण्याचे अनेक व्हिडीओ व्हायरल होत असतात. काही व्हिडीओ मजेशीर असतात तर काही व्हिडीओ थक्क करणारे असतात. काही व्हिडीओ तर पाहून संताप येतो. सध्या असाच एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये तुम्हाला दिसेल की एका तरुणाने चक्क पीएमटी बसबरोबर प्रँक केला आहे, जो कोणालाही आवडलेला नाही आणि आवडणारही नाही. नेमका हा प्रँक काय, हे जाणून घेण्यासाठी हा व्हिडीओ एकदा पाहाच.
पुणे हे ऐतिहासिक शहर आहे. या शहराचा इतिहास, येथील संस्कृती, ऐतिहासिक वास्तू या शहराची ओळख सांगतात. पुण्यातील पुणेरी भाषा, शिक्षण, कला, पुणेरी पाट्या, खाद्यपदार्थ एवढंच काय तर पीएमटीची सुद्धा अनेकदा सोशल मीडियावर चर्चा रंगते. काही पुणेरी लोक सोशल मीडियावर पुणेरीपणा मिरवतात पण चुकीच्या पद्धतीने पुणेरीपणा मिरवणाऱ्या लोकांवर सोशल मीडियावर टीका केली जाते. सध्या या व्हायरल व्हिडीओमध्ये स्वत:ला पुणेरी सांगणारा तरुण चक्क पीएमटीबरोबर प्रँक करतो.

शूजची लेस बांधण्यासाठी तरुणाने थांबवली पीएमटी बस

या व्हायरल व्हिडीओमध्ये तुम्हाला दिसेल की एक तरुण एका बस स्टॉपजवळ उभा आहे. तितक्यात येते आणि तो बसला हात दाखवतो. प्रवासी चढणार या हेतून बस ड्रायव्हर बस थांबवतो. हा तरुण प्रवासी धावत धावत बसच्या पुढील दरवाज्याजवळ जातो. त्याच्या शूजची लेस निघालेली असते म्हणून तो बसच्या दरवाज्यात एक पाय ठेवून लेस बांधतो. तरीसुद्धा बस ड्रायव्हर काहीही म्हणत नाही. लेस बांधल्यावर तो बसमध्ये चढणार अशी अपेक्षा असणे साहजिक आहे पण हा तरुण बसमध्ये चढत नाही उलट बस ड्रायव्हरला हात दाखवत हसत हसत माघारी फिरतो. याचा अर्थ फक्त बसच्या दरवाज्यात पाय ठेवून शूजची लेस बांधता यावी, म्हणून तो बस थांबवतो. या बसचा नंबर ८७ आहे. सध्या हा व्हिडीओ तुफान व्हायरल होत असून नेटकरी या तरुणावर जोरदार टीका करताना दिसत आहे.

पाहा व्हायरल व्हिडीओ (Viral Video)

crazypunekarr या इन्स्टाग्राम अकाउंटवरून हा व्हिडीओ शेअर करण्यात आला असून या व्हिडीओवर अनेक युजर्सनी प्रतिक्रिया दिल्या आहेत. एका युजरने लिहिलेय, “आमचीच बस भेटली का तुला?” तर एका युजरने लिहिलेय, “यांच्यामुळे बस थांबवत नाही” आणखी एका युजरने लिहिलेय, “याला म्हणतात आ बैल मुझे मार” एक युजर लिहतो, “अशा लोकांना अद्दल घडवायला पाहिजे”