Viral Video : टोइंग वाहन म्हणजे टो ट्रक जो इतर वाहनांना खेचून नेण्यासाठी वापरला जातो. विशेषत: दुर्घटनेनंतर एखादे वाहन खराब झाले किंवा अडकले तर टोइंग वाहनाने ओढून नेले जाते तसेच वाहतूक व्यवस्थापनासाठी किंवा काही विशेष परिस्थितीत वाहने एका जागेवरून दुसऱ्या जागेवर हलवण्यासाठी टोइंग वाहनाचा वापर केला जातो. पण सर्वात चर्चेत असलेला वापर म्हणजे नो पार्किंग झोन मध्ये कोणी चालकाने वाहन पार्क केले तर टोइंग वाहनाने ते वाहन उचलून थेट पोलीस स्टेशनमध्ये जमा केले जाते. सोशल मीडियावर तुम्ही टोइंग वाहनामध्ये नो पार्किंग परिसरात पार्क केलेल्या गाड्या भरलेल्या पाहिल्या असतील. सध्या असाच एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये तुम्हाला दिसेल की एका तरुणाची गाडी उचलून टोइंग वाहनामध्ये टाकल्यामुळे हा तरुण चक्क टोइंग वाहनासमोर भर रस्त्यावर झोपला आहे. सध्या हा व्हिडीओ चांगलाच व्हायरल होत आहे.

या व्हायरल व्हिडीओ आळंदी येथील आहे. व्हिडीओत तुम्हाला टोइंग वाहन दिसेल. या वाहनासमोर एक तरुण चक्क झोपलेला दिसत आहे. तो भररस्त्यावर झोपला आहे. नो पार्किंग परिसरात पार्क केलेली त्याची गाडी उचलून थेट टोइंग वाहनामध्ये टाकल्याने तो संतापला व थेट टोइंग वाहनाचा रस्ता अडवण्यासाठी थेट गाडीसमोर झोपला. हा व्हिडीओ पाहून कोणीही अवाक् होईल. तिथे ट्रॅफिक पोलीस सुद्धा दिसत आहे. येणारे जाणारे लोक या तरुणाकडे बघत आहे. सध्या हा व्हिडीओ चांगलाच व्हायरल होत आहे.

पाहा व्हायरल व्हिडीओ

punewatavaran या इन्स्टाग्राम अकाउंटवरून हा व्हिडीओ शेअर करण्यात आला असून या व्हिडीओच्या कॅप्शनमध्ये लिहिलेय, “गाडी का उचलली?
आळंदीत दुचाकीस्वार थेट रस्त्यावर टोईंग वाहनासमोर झोपला”
या व्हिडीओवर अनेक युजर्सनी प्रतिक्रिया दिल्या आहेत. एका युजरने लिहिलेय, “याला म्हणतात डेरिंग” तर एका युजरने लिहिलेय, “पुणे तिथे काय उणे” आणखी एका युजरने लिहिलेय, “एक नंबर भावा मी 500 देऊन गाडी सोडवली माझी” एक युजर लिहितो, “सगळ्यात फास्ट कारवाई म्हणजे हीच”