नॉनव्हेज पदार्थांमध्ये सर्वात झटपट आणि अगदी निवडक मसाले वापरून तयार होते ते म्हणजे, अंड्याचे ऑमलेट. काहीजण या ऑमलेटला अंड्याचा पोळा असेदेखील म्हणतात. एक-दोन अंडी, मीठ, तिखट किंवा मिरची आणि हळद घालून मस्त फेटून घेतलेले अंडे गरम तव्यावर टाकले, कि अक्षरशः ५ मिनिटात मसाला ऑमलेट खाण्यासाठी तयार होते. अर्थात हा झाला सर्वात झटपट आणि सोपा मार्ग. काहींना यामध्ये वेगवेगळ्या भाज्या घालून, छान जाडसर ऑमलेट बनवायला आणि खायला आवडते.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

मात्र असे करताना एक विशिष्ट त्रास अनेकांना होतो. तो म्हणजे, ऑमलेट तव्यावर पलटणे. आता ते आकाराला लहान असुदे किंवा मोठे, ऑमलेट तव्यावर पलटणे काहींना अजिबातच जमत नाही. बऱ्याचदा तव्यावर पसरवले अंड्याचे मिश्रण पलटण्यावेळी मध्येच तुटते आणि मग सगळी मेहेनत वाया गेल्यासारखे वाटते. असे तुमच्याबरोबरही झाले आहे का?

हेही वाचा : शेतकरी आंदोलनाला विरोध करण्यासाठी लोक खरंच उतरले रस्त्यावर? जाणून घ्या ‘या’ Viral video मागील सत्य

सध्या सोशल मीडियावर अत्यंत सहज आणि सोप्या पद्धतीने अंड्याचे ऑमलेट पलटण्याची एक ट्रिक किंवा हॅक दाखवणारा व्हिडीओ व्हायरल होत आहे. मात्र तो व्हिडीओ पाहून खरंच त्या हॅकची काही गरज होती का? असा प्रश्न अनेकांना पडला आहे. त्याला कारणसुद्धा तसेच आहे. व्हिडीओमध्ये एक महिला ऑमलेट तव्यावर उलटण्यासाठी चक्क दोऱ्याचा वापर करत आहे. आता हे तिने कसे केले ते समजून घेऊ.

सुरवातीला व्हिडीओमधील महिलेने, एका तव्यावर दोन दोरे अधिक चिन्हाप्रमाणे ठेवले. त्यावर नेहमीप्रमाणे अंड्याचे मिश्रण पसरवतो, तसे पसरले. ऑमलेट अर्धवट शिजल्यानंतर, तिने तव्यावर ठेवलेल्या दोऱ्याच्या सर्व बाजू हातात घेऊन, दोऱ्याच्या मदतीने ते ऑमलेट तव्यावर पलटले. शेवटी ऑमलेट दोन्ही बाजूंनी पूर्ण शिजल्यानंतर त्यामध्ये अडकलेल्या दोऱ्यांना बाहेर काढून घेतले असल्याचे आपण या व्हिडीओमध्ये पाहू शकतो.

आता ही हॅक बघून नेटकऱ्यांनी मात्र कपाळाला हात मारून घेतला आहे. त्यांच्या या व्हिडिओवर काय प्रतिक्रिया आहेत ते पाहू.

हेही वाचा : लग्नाला गेल्यानंतर जेवताना कसा ठेवाल जिभेवर ताबा? Viral video मध्ये सांगितलेली ही ट्रिक पाहा….

“मला वाटलं होतं कि ते दोरे ऑमलेटचे चार भाग करण्यासाठी आहेत..” असे एकाने म्हंटले. दुसऱ्याने, “ब्रेड ऑमलेट नव्हे.. हे तर थ्रेड ऑमलेट” असे दुसऱ्याने लिहिले आहे. “असं करायची नेमकी काय गरज होती काय माहित..” असे तिसऱ्याने लिहिले आहे. चौथ्याने, “वाह! अस्तित्वात नसलेल्या प्रश्नांवर या बाईने उत्तर शोधून काढलं आहे.” असे म्हंटले आहे. तर शेवटी पाचव्याने, “भारीच.. या ट्रिकचा खरंच उपयोग होतो” असे म्हंटले आहे.

इन्स्टाग्राम या सोशल मीडियावर @supersreenivas नावाच्या अकाउंट वरून हा व्हिडीओ शेअर झाला आहे. आत्तापर्यंत या व्हिडीओला ४८.४ मिलियन इतके व्ह्यूज मिळाले आहे.

मराठीतील सर्व ट्रेंडिंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Video of woman showing how to flip omelette with using thread went viral on social media netizens react dha
First published on: 23-02-2024 at 08:48 IST