Viral Video: गोविंदाच्या 'दुल्हे राजा'वर या मेंढपाळाचा भन्नाट डान्स; स्टेप्स पाहून नेटकरीही झाले फिदा | Video Shepherds dance on govindas dulhe raja song goes viral netizens are impressed by his steps | Loksatta

Viral Video: गोविंदाच्या ‘दुल्हे राजा’वर या मेंढपाळाचा भन्नाट डान्स; स्टेप्स पाहून नेटकरीही झाले फिदा

नेटकऱ्यांची मनं जिंकणारा मेंढपाळाचा डान्स तुम्ही पाहिलात का?

Viral Video: गोविंदाच्या ‘दुल्हे राजा’वर या मेंढपाळाचा भन्नाट डान्स; स्टेप्स पाहून नेटकरीही झाले फिदा
या मेंढपाळ्याचा डान्स व्हिडीओ सध्या व्हायरल होत आहे (फोटो: सोशल मीडिया)

सोशल मीडियावर दररोज अनेक व्हिडीओ व्हायरल होत असतात. त्यातील भन्नाट जुगाड, वेगवेगळे कौशल्य अचंबित करणारे असतात. असे व्हिडीओ दिवसभराचा ताण हलका करण्यासाठी मदत करतात. जास्तीतजास्त लोकांचे मनोरंजन व्हावे या हेतूने हे व्हिडीओ अधिकाधिक शेअर केले जातात. असाच एक व्हिडीओ सध्या प्रचंड व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये एक मेंढपाळ डान्स करत असल्याचे दिसत आहे.

व्हायरल होणाऱ्या या व्हिडीओमध्ये एक मेंढपाळ आणि त्याच्या मेंढ्या रस्त्यावरून जात असल्याचे दिसत आहेत. रस्त्यावरून जात असताना हा मेंढपाळ गोविंदाचे लोकप्रिय गाणे ‘दुल्हे राजा’ वर डान्स करू लागतो. त्याच्याबरोबर असणारा लहान मुलगाही त्यात सहभाग घेतो. या मेंढपाळाच्या डान्स स्टेप्स पाहून तुम्हीही अचंबित व्हाल, पाहा व्हायरल होणारा हा व्हिडीओ.

आणखी वाचा: लिफ्ट बंद पडताच त्यात तीन लहान मुली अडकल्या अन्…; Viral Video ने वाढवली पालकांची चिंता

व्हायरल व्हिडीओ:

या व्हायरल व्हिडीओने नेटकऱ्यांची मनं जिंकली असून, नेटकरी या मेंढपाळाच्या कौशल्याचे कौतुक करत आहेत.

मराठीतील सर्व ट्रेंडिंग ( Trending ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 05-12-2022 at 13:20 IST
Next Story
माणूस नव्हे हैवान! कुत्र्यांच्या नवजात पिल्लांना जिवंत जाळलं आणि पिल्लांच्या आईला…