Viral Video of damaged road : प्रवासादरम्यान रस्त्यावरचे खड्डे काही केल्या प्रवाशांचा पाठलाग काही सोडत नाहीत. पाऊस, ऊन असो किंवा हिवाळा या डांबरी रस्त्याच्या खड्ड्यांमधून प्रवास करणे आपल्यातील प्रत्येकासाठी कठीण जाते आणि धोकादायकही ठरते. तर याचसंबंधित लाइटहाऊस जर्नलिझमला सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर शेअर केलेला एक व्हिडीओ आढळला, ज्यामध्ये वाहने जाताच खड्ड्यांतून पाणी निघताना दिसते आहे. तसेच हा व्हिडीओ भारतातील असल्याचा दावा करण्यात आला होता.

काय होत आहे व्हायरल?

एक्स (ट्विटर) युजर @iamharmeetK हरमित कौर के यांनी एक व्हिडीओ शेअर केला आहे. डांबरी रस्त्यावर एक मोठा खड्डा दिसतो आहे. तसेच गाड्या जाताच या रस्त्यावरून पाणी दोन्ही बाजूने बाहेर पडताना दिसत आहे. हा ‘मोदीजी हे काय तंत्रज्ञान आहे?’ ; अशी कॅप्शन त्यांनी या व्हिडीओला दिली आहे.

इतर युजर्सदेखील याच दाव्यासह व्हिडीओ शेअर करत आहेत.

हेही वाचा…VIDEO: धक्कादायक! भरदिवसा तरुणाने कापल्या विजेच्या खांबाचे केबल्स अन् नट; पण घटनेची खरी बाजू काय?

तपास :

आम्ही व्हिडीओमधून मिळवलेल्या कीफ्रेमचा शोध घेतला. शोधादरम्यान आम्हाला prensalibre.com नावाच्या वेबसाइटवर एक रिपोर्ट दिसला.

Video: grieta en Villa Nueva afecta de nuevo el tránsito en la ruta al Pacífico

रिपोर्टमध्ये सांगितले होते की, युजर्सनी पॅसिफिकच्या मार्गाच्या १४ किमीवर एक घटना नोंदवली, जिथे पावसामुळे पाण्याचा प्रवाह डांबरात तयार झालेल्या रस्त्यांच्या पातळीपेक्षा जास्त होता. अधिकाऱ्यांच्या मते या घटनेची दरवर्षी पुनरावृत्ती होते. जेव्हा आम्ही ‘Villa Nueva’ ही संज्ञा शोधली तेव्हा आम्हाला आढळले की, हे शहर ग्वाटेमालामध्ये आहे. रिपोर्टमध्ये पुढे नमूद केले आहे की, युजर्सनी एक व्हिडीओ पोस्ट केला आहे, ज्यामध्ये रस्त्याच्या खालून पाणी वाहत असताना डांबराचा काही भाग वर होताना दिसत आहे.

आम्हाला lahora.gt वरदेखील एक बातमी आढळली.

Conred reporta grieta en km 14 en ruta al Pacífico; alcalde de Villa Nueva exige a CIV trabajar en cavernas

१२ सप्टेंबर २०२४ रोजी पोस्ट केलेल्या रिपोर्टमध्ये असे म्हटले आहे की, आपत्ती निवारणासाठी राष्ट्रीय समन्वयक (Conred) ने व्हिला नुएवाच्या अधिकार क्षेत्रात पॅसिफिककडे जाणाऱ्या CA-9 च्या १४ किलोमीटरवर डांबरात “क्रॅक” असल्याचे सांगितले आहे. सोशल मीडिया युजर्सनी व्हिडीओ शेअर केला; ज्यामध्ये पाण्याच्या दाबाने डांबर उचलल्याचे दिसून येते.

आम्हाला एक्स (ट्विटर) वर पोस्ट केलेला व्हिडीओदेखील सापडला.

निष्कर्ष : ग्वाटेमालाचा खराब झालेल्या रस्त्याचा व्हिडीओ भारताचा असल्याचा दावा करून व्हायरल होत आहे. पण, तपासादरम्यान आम्हाला आढळून आले की, व्हायरल दावा दिशाभूल करणारा आहे.