Sonu Sood Viral Video: करोना काळात सोनू सूदने केलेल्या कामाचं आजही सर्व स्तरातून कौतुक होतं. केंद्र सरकारपासून ते अगदी जनसामान्यांपर्यंत लाखोंच्या मनात सोनू सूद हा खऱ्या आयुष्यातील हिरो म्हणून समोर आला आहे. सोनूने सुद्धा आपल्या कामातून वेळोवेळी आपल्याला मिळणारे प्रेम व आपल्यावरील विश्वास सार्थकी लावला आहे. पण अलीकडे व्हायरल होणाऱ्या एका व्हिडिओत सोनू असं काही करून बसला की आता सोशल मीडियावर त्याला प्रचंड ट्रोल केलं जात आहे. इतकंच नव्हे तर अनेकांनी सोनू सूदवर कारवाईची मागणी केली आहे. नेमकं असं काय घडलं हे आता आपण पाहुयात.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

ट्विटरवर १३ डिसेंबरला सोनू सूदने स्वतः एक २२ सेकंदाची क्लिप शेअर केली होती. यामध्ये सोनू सूद हा एका धावत्या ट्रेनच्या दाराशी बसलेला दिसून येत आहे. यावेळी ट्रेनचा वेगही तसा जास्त असल्याने बऱ्याचदा सोनू ट्रेनच्या बाहेर लटकताना पाहायला मिळत आहे. अगदी ट्रेनच्या दाराच्या टोकावर फक्त पायाच्या बोटांवर उभं राहून सोनुने केलेला हा प्रताप सध्या तुफान व्हायरल होत आहे. लोकांच्या हिरोचा हा स्टंट लोकांना काही आवडलेला नाही. अनेकांनी सोनूवर टीका करून त्याच्यावर कारवाई केली जावी अशी मागणी केली आहे.

तू लोकांचा हिरो आहेस, तुझ्याकडे आदर्श म्हणून पाहिलं जातं. तू हा जीव धोक्यात घालणारा आदर्श दाखवत असशील तर लोकांनी पण हेच करावं का? लोकांनी आपण असे प्रकार करून जीव गमवावा का असा प्रश्न सोशल मीडियावर केला जात आहे. सोनू सूदचा हा व्हिडीओ नेमका काय आहे पाहुयात…

सोनू सूदला स्टंट नडला

हे ही वाचा<< पाय घसरला अन खेळ संपला! ट्रेन व प्लॅटफॉर्ममध्ये अडकलेल्या तरुणीचा मृत्यू; अंगावर काटा आणेल हा Video

दरम्यान, या व्हिडिओला सोशल मीडियावर तब्बल ५ लाखाहून अधिक व्ह्यूज आहेत. आपण हा व्हिडीओ पाहिलात, व्हिडीओवरील कमेंट्स सुद्धा वाचल्यात, तुमचं यावर नेमकं काय मत आहे हे सुद्धा नक्की कळवा!

मराठीतील सर्व ट्रेंडिंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Video sonu sood sitting on speedy train dashboard shocking reaction by angry fans asking for action by rail ministry svs