Viral video: तुम्ही अंडी, केळी खाल्ली असतील, यापासून बनवलेले पदार्थ चाखले असतील, यापासून ब्युटी प्रोडक्टस बनवून त्याचाही वापर केला असेल. पण एका व्यक्तीने अंडी आणि केळी एकत्र मातीत गाडली. त्यानंतर चमत्कार घडला. मातीत अंडी, केळी पुरल्यानंतर त्याचा असा परिणाम झाला की कुणी विचारही केला नसेल. हा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होतो आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

यामुळे घरातल्या ओल्या कचऱ्याचाही चांगला विनियोग होतो आणि घरच्या घरी तयार केलेले खत आपल्या झाडांना मिळाल्याने झाडांची छान वाढही होण्यास मदत होते. आता हे कंपोस्ट खत नेमके कसे तयार करायचे असा प्रश्न जर आपल्याला पडला असेल तर आपण सोप्या पद्धतीने घरच्या घरी कंपोस्ट खत करण्याची पद्धत पाहूया…

बघा कशी झाली कमाल

गार्डनिंग करणाऱ्या एका व्यक्तीने हा व्हिडीओ शेअर केला आहे. व्हिडीओत तुम्ही पाहू शकता ही व्यक्ती मातीत केळी आणि अंडी पुरतेय त्यानंतर त्यावर टोमॅटोच्या बिया टाकते. याशिवाय या व्यक्तीने दुसरं काहीच वापरलं नाही. व्यक्तीने दोन-तीन केळी घेतली आहेत. त्यासोबत दोन तुटलेली आणि एक पूर्ण अंड घेतलं आहे. तुम्ही हवं असल्याचं अंड्याचं कवचही वापरू शकता. त्यानंतर या व्यक्तीने जमिनीत एक छोटा खड्डा बनवला. त्यात अंडी, केळी ठेवली. त्यावर माती घातली. या मातीवर जे रोप हवं त्या बिया टाकायच्या. या व्यक्तीने टोमॅटोच्या बिया टाकल्या. केळी आणि अंडी मातीत कुजतात आणि ते खताप्रमाणे कार्य करतात. यामुळे झाडांना पोषण मिळतं. वेगळ्या खताची गरजच पडत नाही.

पाहा व्हिडीओ

हेही वाचा >> तुम्हीही हेल्दी समजून “ब्राउन ब्रेड” खाता? ‘हा’ VIDEO पाहाल तर झोप उडेल…नागरिकही संतापले

आपल्या गॅलरीत किंवा अगदी खिडकीच्या ग्रीलमध्ये, दारात आपण काही ना काही रोपं आवडीने लावतो. रोपांची पुरेशी काळजी घेण्यासाठी आपण विकेंडला कधी त्याची कापणी करतो तर कधी त्यात खत घालून ही रोपं वाढावीत आणि त्यांना छान फुल यावीत यासाठी त्यांची मशागत करतो. बाजारात मिळणारी कंपोस्ट, शेणखत, गांडूळ खत यांसारखी खतं बरीच महाग मिळतात. त्यापेक्षा आपण अगदी सोप्या पद्धतीने घरच्या घरी कंपोस्ट खत तयार करु शकतो

मराठीतील सर्व ट्रेंडिंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Viral banana egg in soil field farming life hack jugaad video viral on social media trending shocking video srk