Prasika Exclusive Interview 2: सोशल मीडियावर प्रसिका म्हणून प्रसिद्ध असणाऱ्या प्रसाद व दीपिका वेदपाठक या दोघांचा फॅन बेस प्रचंड मोठा आहे. अलीकडेच प्रसिकाने लोकसत्ताच्या ‘इन्फ्ल्यूएन्सर्सच्या जगात’ या सीरीजच्या माध्यमातून एक अत्यंत वेगळा व स्वतंत्र विचार मांडला आहे. फॅमिली प्लॅनिंग हा एखाद्या जोडप्यासाठी अत्यंत खाजगी असा मानला जाणारा विषय असूनही अनेकदा समाज माध्यमांवर सुद्धा उघड उघडपणे याविषयी प्रश्न केले जातात. कलाकार व सोशल मीडियावर सेलिब्रिटींच्या पोस्टखाली अशा कमेंट्स मोजता येणार नाहीत इतक्या असतात. असाच प्रश्न ‘प्रसिका’या जोडीला सुद्धा केला जात होता, ज्यावर प्रसाद व दीपिकाने वेगळा व स्वतंत्र विचार मांडला आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

१०० मुलींचे पालक होण्याचे स्वप्न बाळगणाऱ्या प्रसिकाने स्वतःच्या बाळाला जन्म द्यायचा नाही असा निर्णय घेण्याचं एक खास कारण सांगितलं. जन्म घेणं आपल्या हातात नाही पण जन्म देणं आपल्या हातात आहे. एकीकडे लोकसंख्या वाढीत भारत दरदिवशी पुढे जात असताना गर्दीत आणखी एकाची भर टाकण्याची गरज नाही याउलट ज्यांनी जन्म घेतलाय पण त्यांना बघायला कोणी नाही अशांना आधार देण्याचं काम करायचं आहे असा विचार प्रसिकाने व्यक्त केला आहे. याशिवाय प्रसाद व दीपिकाने हा निर्णय आपला वैयक्तिक असून कोणीही अंधानुकरण करण्याची गरज नाही असेही आवाहन चाहत्यांना केले आहे.

दरम्यान, याच सत्रात प्रसिकाने लंच विथ प्रसिकाच्या नवनवीन कल्पनांविषयी तसेच शेअर मार्केट गुंतवणुकीविषयी अनेक अनुभव सुद्धा शेअर केले आहेत. ही संपूर्ण मुलाखत आपणही पाहूया…

हे ही वाचा<< १३० अपयशी व्हिडीओ, महानगर गॅसमध्ये जॉब ते UIC; पॉवर कपल ‘प्रसिका’ची Exclusive लव्ह स्टोरी नक्की पाहा

तुम्हाला लोकसत्ताच्या या नव्या सीरीजमध्ये आणखी कोणत्या इन्फ्लुएन्सर्सना बघायला आवडेल हे कमेंट करून नक्की कळवा.

मराठीतील सर्व ट्रेंडिंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Viral couple prasika tells why want to be child free and adopt 100 girls in exclusive interview uic deepika prasad vedpathak svs