आपल्याकडे स्वतःची बाईक असावी हे प्रत्येक व्यक्तीचे स्वप्न असते. त्यासाठी खूप प्लॅनिंग, सेविंग केले जाते किंवा इमआयचा पर्याय स्विकारला जातो. अशी खूप मेहनत घेऊन बाईक घेण्याचे स्वप्न पूर्ण केले जाते. सध्या अशाच एका बाईकची सर्वत्र चर्चा होत आहे. याचे कारण म्हणजे बाईक विकत घ्यायला एक व्यक्ती चक्क गोणी भरून नाणी घेऊन आला. नेमकं काय घडलं जाणून घ्या.
एएनआय या वृत्तसंस्थेनं दिलेल्या वृत्तानुसार आसाममधील सुरंजन रॉय या व्यक्तीने काही वर्ष साठवलेल्या नाण्यांनी बाईक विकत घेतली आहे. ड्रीम बाईक विकत घेण्यासाठी त्याने वर्षभर नाणी साठवली होती. यामध्ये ५०,००० रुपये रक्कम जमा झाली. या नाण्यांनी भरलेली गोणी घेऊन सुरंजन रॉय बाईक विकत घेण्यासाठी पोहचले, या फोटोंची सध्या सर्वत्र चर्चा होत आहे. पाहा व्हायरल होणारे फोटो.
व्हायरल फोटो :
बाईक विकत घेण्यासाठी अशाप्रकारे पैसे साठवल्याबद्दल नेटकरी कौतुक करत असून, हे फोटो सध्या व्हायरल होत आहेत.