Jungle Fight Viral Video: जंगल म्हणजे नेहमीच रोमांच आणि थरारानं भरलेलं असतं. शिकारी आणि शिकार यांचा खेळ इथे कधी थांबत नाही. कधी शिकारी वरचढ होतो; तर कधी कधी वरचढ ठरलेल्या शिकाऱ्यालाही नंतर अशी परिस्थिती समोर येते की, आश्चर्यकारकपणे त्याला माघार घ्यावी लागते. काही वेळा असे क्षण घडतात की, ज्यावर विश्वास ठेवणंही कठीण जातं. सध्या सोशल मीडियावर व्हायरल झालेला एक व्हिडीओ याचं जिवंत उदाहरण आहे. या एका व्हिडीओत तुम्ही पाहाल की, एका हरणावर वेगवेगळे शिकारी तुटून पडतात; पण शेवटी जे घडतं, ते सगळ्यांनाच थक्क करून सोडतं. कारण- जंगलाचा खरा राजा असलेला सिंह त्या ‘रंगमंचावर’ उतरलेला असतो.
व्हिडीओच्या सुरुवातीला एक बिबट्या हरणाला आपली शिकार बनवून ओढून आणताना दिसतो. जणू बिबट्या विजय नक्कीच आहे, असं भासतं. पण अचानक तिथे जंगली कुत्र्यांचा मोठा कळप धावत येतो. इतके कुत्रे पाहून बिबट्याला स्वतःचीच काळजी वाटते आणि तो हरण तसंच टाकून थेट झाडावर चढतो.
हरणाचा संघर्ष
बिबट्या झाडावर चढल्याचा फायदा घेत हरण तेथून पळण्याचा प्रयत्न करतो; पण तितक्यात जंगली कुत्र्यांनी त्याला चारही बाजूंनी वेढलं आणि क्षणार्धात पाडून टाकलं. हरणाचा संघर्ष काही सेकंद चालतो; पण तितक्यात तिथे आणखी एक गट दाखल होतो आणि दृश्य अजूनच भयावह होतं.
हायनाची एन्ट्री
यावेळी अचानक हायना येतात. त्यांना पाहताच जंगली कुत्र्यांची घाबरगुंडी उडते. मग हायना थेट हरणावर झडप घालतात आणि डोळ्यांच्या पापण्या लवतात न लवतात तोपर्यंत ते हरणाचं मांस फस्त करतात. काही क्षणांत फक्त हाडांचा ढीग शिल्लक राहतो. या क्षणी असं वाटतं की, शिकार संपली… पण खरी कथा तर अजून पुढेच असते…
वनराजाची एन्ट्री
जंगलातल्या या घटनेत खरं थरारक वळण इथेच येतं. अचानक तिथे सिंहाचा प्रचंड गर्जना करीत प्रवेश होतो. ते तणावग्रस्त वातावरण आणखीनच गडद होतं. सिंह तिथे आलेल्या हायनांवर तुटून पडतो. मग भीतीने ते सगळे पळ काढतात; पण एका दुर्दैवी हायनाला सिंहाच्या पंजातून सुटता येत नाही. शेवटी जंगलाचा खरा राजा कोण हे पुन्हा एकदा सिद्ध होतं.
व्हायरल व्हिडीओंचा धुमाकूळ
ही संपूर्ण घटना जंगल पर्यटनासाठी आलेल्या पर्यटकांनी एकामागोमाग घेतलेल्या दोन व्हिडीओंद्वारे आपल्या कॅमेऱ्यात कैद केली. थोड्याच वेळात या दोन व्हिडीओंचा संगम सोशल मीडियावर झपाट्याने पसरला. ट्विटरवरील @Predatorvids या अकाउंटवर शेअर झालेल्या या एका मिनिटाच्या संगमाला हजारो व्ह्युज मिळाले आहेत. अनेकांनी हा व्हिडीओंचा संगम पाहून थरकाप उडाल्याची प्रतिक्रिया दिली आहे. काहींनी म्हटलेही आहे की, हा व्हिडीओ दोन वेगवेगळ्या घटनांचा संगम आहे.
येथे पाहा व्हिडीओ
शेवटी… जंगलाचा खेळच निराळा असतो. शिकारी कधी जिंकतो, तर कधी तो स्वतःच शिकार ठरतो. पण, सिंहाच्या एन्ट्रीनं दाखवून दिलं जंगलातला खरा राजा नेहमी सिंहच असतो.