Viral Video: अनेकदा सोशल मीडियावर अपघाताचे किंवा भांडण, मारहाणीचे अनेक व्हिडीओ व्हायरल होताना आपण पाहतो; जे समोर येताच काही क्षणांत लाखो व्ह्युज आणि लाइक्स मिळवतात. आतादेखील असाच एक व्हिडीओ सोशल मीडियावर खूप व्हायरल होतोय.

सोशल मीडियावर अनेकदा घरगुती भांडणाचे व्हिडीओ व्हायरल होत असतात. सासू, सून, नवरा-बायको यांच्यातील छोट्या-मोठ्या भांडणाच्या अनेक घटना सोशल मीडियावर दिसतात. नवरा आणि बायको म्हटलं तर वाद हे होतातच. परंतु, कधी कधी या छोट्या छोट्या भांडणातूनच मोठ्या वादाचा भडका उडतो. दरम्यान, आता एका पती-पत्नीचा असा एक व्हिडीओ व्हायरल होतोय ज्यात ते दोघेही एकमेकांवर रागावलेले दिसत आहेत.

या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता, एक महिला रस्त्याच्या कडेला उभी राहिली असून तिचा पती तिथे बाईक घेऊन येतो. यावेळी ती त्याच्याशी काहीच न बोलता बाईकच्या मागच्या बाजूला तोंड करून बसते. यावेळी तिचा पतीदेखील तिच्या काहीही न बोलता स्वतःचे तोंड फिरवतो. त्यांच्यातील हे अबोल भांडण पाहून नेटकरी अनेक कमेंट्स करताना दिसत आहे.

पाहा व्हिडीओ:

हा व्हिडीओ इन्स्टाग्रामवरील @jilha_satara या अकाउंटवर शेअर करण्यात आला आहे. त्यावर आतापर्यंत अनेक लाइक्स मिळाल्या आहेत. तसेच त्यावर नेटकरीही अनेक कमेंट्स करताना दिसत आहेत. एकानं लिहिलंय, “अशी भांडणं आमच्यात पण होतात” दुसऱ्यानं लिहिलंय, “खूपच मजेशीर व्हिडीओ”, तर आणखी एकाने लिहिलंय की, “कॉमेडी आहे हे”