Shocking video: आरोग्यदायी खा आणि निरोगी राहा असा सल्ला सगळेच देतात मात्र हेच आरोग्यदायी खाणं कुठे मिळतं असा प्रश्न सध्या सगळ्याच गृहिणींना पडतो. त्याच कारणं असं की आता बाजारात असा कोणताच पदार्थ राहिलेला नाही ज्यात भेसळ नाही. अगदी भाजी पाल्यातही मोठ्या प्रमाणात भेसळ होताना दिसते. बाजारातून भाजीपाला विकत घेताना आपल्याला आरोग्यदायी आणि ताज्या भाज्या मिळतील, असा आपला विश्वास असतो. मात्र, एका धक्कादायक व्हिडीओमुळे हा विश्वास पुन्हा डळमळीत झाला आहे. सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या या व्हिडीओत कृत्रिमरीत्या तयार करण्यात आलेल्या कोबी दाखवण्यात आला आहे. यामुळे बाजारात सहजपणे नकली भाजीपाला विकला जातोय हे समोर आलेले आहे. ज्यामुळे ग्राहकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

सगळ्या भाज्या खाल्ल्या पाहिजेत, असं म्हणत आपण आहारात सर्व भाज्यांचा समावेश करण्याचा प्रयत्न करीत असतो. आपल्या आरोग्याच्या दृष्टिकोनातून हा विचार करीत असलो तरी त्याची दुसरी बाजू गंभीर आहे. कारण- भाजी मंडईभोवती अस्वच्छता वाढली आहे. त्यामुळे आरोग्यासाठी फायदेशीर असलेल्या पालेभाज्या आरोग्यासाठी अपायकारक ठरत असून, ग्राहक भाजी घेतात की आजार, असा प्रश्‍न उपस्थित झाला आहे. इथपर्यंत ठीक होतं; मात्र सध्या समोर आलेला व्हिडीओ पाहून भाज्या थेट आता शेतातूनच आणायच्या का, असा सवाल उपस्थित होतोय. कारण- आता विक्रेते बाजारात बनावट भाज्याही विकत आहेत. नुकत्याच समोर आलेल्या व्हिडीओमध्ये कोबी कृत्रिमरीत्या कसा बनवला जातो याची प्रक्रिया दाखवणारा एक व्हिडीओ समोर आला आहे. हा व्हिडीओ पाहून तुम्ही कोबी घेताना १०० वेळा विचार कराल हे नक्की…

एका व्यक्तीने दावा केला आहे की, त्यानं बाजारातून विकत आणलेला कोबी हा बनावट कोबी आहे. हा कोबी प्लास्टिकचा असल्याचाही त्यानं दावा केला आहे. आपला दावा सिद्ध करण्यासाठी व्यक्तिने कोबीची पाने जाळण्याचा प्रयत्न केला पण त्याला काहीच झाले नाही. त्यानंतर त्याने पुढे जाऊन पान फाडण्याचा प्रयत्न केला,पण ती पुन्हा अयशस्वी झाली. खरं तर,व्यक्तीने दावा केला की, जळल्यानंतर पान आणखी ‘घट्ट आणि ताणलेले’ होते एखाद्या प्लास्टिकप्रमाणे. पुढे त्यानं अशाप्रकारे कोबी घेताना सावधान राहण्याचा सल्ला दिला आहे.

पाहा व्हिडीओ

हा प्रकार पाहून अनेकांनी संताप व्यक्त केला आहे. “लोकांच्या जीवाशी खेळ सुरू आहे,” “जगायचं की नाही” अशा प्रतिक्रिया अनेक नेटकऱ्यांनी दिल्या आहेत. बाजारात आधीच भेसळयुक्त खाद्यपदार्थांमुळे ग्राहक फसवले जात आहेत. तेल, मसाले, दूध यांसारख्या मूलभूत वस्तूंमध्ये भेसळ ही नित्याचीच बाब बनली आहे. मात्र, आता थेट भाज्यांमध्येही भेसळ होत असल्याचं उघड झाल्यानं खवय्यांच्या आरोग्यावर गंभीर परिणाम होण्याची शक्यता आहे.

बाजारात आधीच मोठ्या प्रमाणावर आपली फसवणूक होत असते. भेसळयुक्त पदार्थ, प्रक्रिया केलेले पदार्थ खाण्याशिवाय आता आपल्याला पर्याय नाह. कारण- आता सर्वच पदार्थांमध्ये भेसळ केली जाते. त्यामुळेच हल्ली आजारी पडण्याचं प्रमाण वाढलं आहे.

मराठीतील सर्व ट्रेंडिंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Viral video artificial vegetables cabbage selling in market shocking video goes viral on social media srk