Viral Video: हल्ली सोशल मीडियामुळे अनेक कलाकार नव्याने घडू लागले आहेत. अगदी लहान मुलांपासून ते वयोवृद्धांपर्यंत अनेक जण रील्सद्वारे आपली कला सादर करताना दिसतात. कधी डान्स, तर कधी गाणी, अभिनय अशा विविध गोष्टी हौशी कलाकार शेअर करतात. त्यातील काहींचे व्हिडीओ इतके व्हायरल होतात की, ज्यामुळे त्यातील कलाकारांचं संपूर्ण आयुष्य बदलून जातं. दरम्यान, आता एका महिलेचा डान्स खूप व्हायरल होतोय, जो पाहून नेटकरीही कौतुक करताना दिसत आहेत.

खेड्यातील अनेक महिलांच्या आयुष्यातील बराच वेळ त्यांचं कुटुंब, मुलं, घराची जबाबदारी या सगळ्या गोष्टींभोवती फिरत असतं. यापलीकडे जाऊन त्यांना स्वतःसाठी काहीतरी करण्यासाठी फार कमी मिळतो. पण, त्यातूनही हल्ली सोशल मीडियामुळे अनेक हौशी महिला आपल्यातील कला न घाबरता सादर करू लागल्या आहेत. या व्हायरल व्हिडीओमध्ये अशाच एका महिलेचा डान्स खूप व्हायरल होतोय.

या व्हायरल व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता की, घराबाहेरील परिसरात एक महिला ‘उई अम्मा’ या गाण्यावर जबरदस्त डान्स करीत आहे. यावेळी ती महिला त्या गाण्यावर खूप सुंदर नाचते. यावेळी ती डान्सच्या वेगवेगळ्या स्टेप्सही करते. तसेच तिच्या चेहऱ्यावरचे हावभावही पाहण्यासारखे आहेत.

हा व्हिडीओ इन्स्टाग्रामवरील @memesbysukhraj या अकाउंटवर शेअर करण्यात आला असून, त्यावर आतापर्यंत एक दशलक्षाहून अधिक व्ह्युज आणि अनेक लाइक्स मिळाल्या आहेत. तसेच यावर अनेक युजर्स कमेंट्स करताना दिसत आहेत.

पाहा व्हिडीओ:

एका युजरने लिहिलेय, “याला बोलतात गावाकडचं टॅलेन्ट.” दुसऱ्या युजरने लिहिलेय, “तुमच्यापुढे बॉलीवूड अभिनेत्री फिकी.” तिसऱ्या युजरने लिहिलेय, “आईशप्पथ! खूप छान नाचता तुम्ही.” आणखी एकाने लिहिलेय,, “खरंच जबरदस्त डान्स.”