Viral Video: लावणी नृत्य ही महाराष्ट्राची लोककला आहे. गावाच्या जत्रेतून पिढ्यापिढ्या मनोरंजन करणारी लावणी आजही लोकांच्या पंसतीस उतरते. लावणी ही वाटते तितके सोपे नाही. लावणी करण्यासाठी नृत्याची जाण तर लागतेच त्याचबरोबर नृत्य करण्यासाठी अदाही लागते. ढोलकीच्या तालावर आणि घुंगराच्या बोलावर एकापेक्षा एक लावणी सादर करणाऱ्या कलाकारांचे अनेक व्हिडिओ रोज सोशल मीडियावर व्हायरल होत असतात पण मोजकेच व्हिडिओ असतात जे प्रेक्षकांच्या मनावर राज्य करतात. आताही असाच एक सुंदर व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
समाजमाध्यमांवर विविध विषयांवर आधारित व्हिडीओ व्हायरल होत असतात. ज्यात कधी समारंभाचे व्हिडीओ, लग्नाचे व्हिडीओ तर कधी नृत्याचे व्हिडीओ पाहायला मिळतात. परंतु यातील काही मोजकेच व्हिडीओ सोशल मीडियावर चर्चेत येतात. आता असाच एक व्हिडीओ खूप चर्चेत आलाय. ज्यात एक महिला खूप सुंदर डान्स करताना दिसतेय.
या व्हायरल व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता, एक महिला एका लहान मुलाच्या वाढदिवसाच्या पार्टीमध्ये लावणी करताना दिसतेय. यावेळी ‘वाजले की बारा’ या गाण्यावर लावणी करते तिच्या लावणी स्टेप्स अन् चेहऱ्यावरील हावभाव तुमचेही लक्ष वेधून घेतील. तिचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर खूप व्हायरल होतोय.
पाहा व्हिडीओ:
@kiranphulpagare07 या इन्स्टाग्राम अकाउंटवरुन हा व्हिडीओ शेअर करण्यात आला असून या व्हिडीओला आतापर्यंत हजारो व्ह्यूज अन् लाइक्स मिळाल्या आहेत. तसेच अनेक युजर्स या व्हिडीओ कमेंट्सही करताना दिसत आहेत. एका युजरने लिहिलंय, की, “खूपच भारी नाचला ताई” तर एका युजरने लिहिलेय, “याला म्हणतात खरी लावणी” आणखी एका युजरने लिहिलेय, “अप्रतिम जमलं मस्त” अनेक युजर्सनी या व्हिडीओवर हार्टचे इमोजी शेअर केले आहेत.
