Viral Video: अलीकडे अनेक परदेशी व्यक्ती भारतीय संस्कृती जवळून फॉलो करत असतात. अगदी कृष्णभक्तीत देश सोडून आलेल्या मॉडर्न मीरा असो किंवा बॉलिवूड गाण्यांवर थिरकणारे रिकी पॉन्ड परदेशी व्यक्तींचे भारतप्रेम पाहून अनेकदा उर अभिमानाने भरून येतो. असाच एक प्रकार सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये एका भारतीय तरुणाने आपल्या ऑस्ट्रेलियन पत्नीला आपल्या बीट्सवर असं नाचवलं की सोशल मीडियावर सगळे या जोडप्याच्या प्रेमात पडले आहेत. काहींनी तर या तरुणाला दादा आमचा क्लास घे ना असे म्हणत कमेंट केल्या आहेत. काय आहे हा नेमका व्हिडीओ तुम्हीही पाहा…

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

मेलबर्नमधील ऑस्ट्रेलियन ट्रूनी लव्हलीन वत्स अनेकदा तिच्या भारतीय आयुष्याबद्दल पोस्ट करत असते. भारतीय गोष्टी वापरून त्याचे अनुभव प्रेक्षकांसोबत शेअर करणारे व्हिडीओ तिच्या इंस्टाग्रामवर पाहायला मिळतात. लव्हलीनचे पती भारतीय आहेत. अलीकडेच लव्हलीनने शेअर केलेल्या व्हिडीओमध्ये ती व तिचा पती हरियाणवी गाण्यावर नाचताना दिसत आहेत. यामध्ये लव्हलीनच्या पटीने काळी पठाणी घातली आहे तर तिने स्वतः गुलाबी ड्रेस घातला आहे. अशोक देसवाल यांच्या प्रसिद्ध हरयाणवी गाण्यावर हे जोडपे भन्नाट डान्स करत आहेत.

Video: बाई जीव वाचव आणि पळ.. नवरदेवाने भरमंडपात केलेली ‘ही’ धुलाई पाहून नवरीची तुम्हालाही दया येईल

ऑस्ट्रेलियन तरुणी व भारतीय पती

दरम्यान, .हा व्हिडिओ सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर शेअर करण्यात आल्यापासून त्याला १४ लाख व्ह्यूज आहेत. तर ९० हजाराहून अधिक लाईक्स आणि अनेक कमेंट्स देखील आहेत. अनेकांनी या जोडप्याला पाहून त्यांचे कौतुक केले.

मराठीतील सर्व ट्रेंडिंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Viral video australian wife dances with indian husband on haryanvi baarat song netizens go crazy svs