Funny Video Today: सोशल मीडियावर कधी काय व्हायरल होईल याचा अंदाज लावणे म्हणजे जवळपास अशक्यच! कधी ज्ञानाचे धडे देणारा ऑनलाईन मंच तर कधी खदखदून हसायला लावणारा मित्र. सोशल मीडियावर रोज शेकडो व्हिडीओ व्हायरल होत असतात. यातील अनेक व्हिडीओ हे तणावातून मुक्ती देणारे असतात तर काही बघून आपण पार हादरून जातो. आता व्हायरल होणारा एक व्हिडीओ तुम्हाला थक्क करेलच पण हसून लोटपोट व्हाल असाही आहे.आजवर प्राण्यांचे खूप व्हिडीओ आपण पाहिले असतील. कधी कुत्रा-मांजरीची लढाई तर कधी सिंह व हत्तीचा सामना. पण आजच्या व्हिडीओमध्ये आपण जे पाहणार आहोत त्याचा कदाचित कधी विचारही केला नसेल.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

इंस्टाग्रामवर ‘animalsinthenaturetoday’ नावाच्या पेजने शेअर केलेल्या या व्हिडिओला १ लाख ६० हजारहून अधिक व्ह्यूज मिळाले आहेत. यात एक माकड आणि कोंबडी देवाच्या मूर्तीजवळ लढताना दिसत आहेत. कोंबडी त्या माकडाकडे येते तेव्हा माकड शांतपणे डोंगराच्या कड्यावर बसून निसर्गाचे सौंदर्य निहाळत असतो तेवढ्यात कोंबडी त्याला डोक्यावर मारते. सुरुवातीला बिचारं माकड तिला फक्त दूर करण्याचा प्रयत्न करतो पण कोंबडीबाई अगदीच जोशात असतात. शेवटी माकड बघून बघून घेतो आणि मग थेट कोंबडीच्या कानशिलात लगावून देतो.

Video: सज्जनगडावर हरवलेले माय- लेक भेटले; बछड्याला घ्यायला आली बिबट्याची आई, पाहा सुंदर क्षण

तुम्ही बघू शकता की कोंबडी या माकडाला ‘कड्यावरून ढकलण्याचा’ प्रयत्न करते. पण, माकड परत लढतो आणि कोंबडीला चापट मारतो. अनेकांना हा व्हिडीओ पाहून लायन किंगमधील भांडणाची आठवण होत आहे. काहींनी या व्हिडिओला कानाखाली मारण्याच्या आवाजाने एडिट केले आहे.

माकड व कोंबडीची मारामारी

दरम्यान, आत्मविश्वास हवा तर असा हवा असे म्हणत कोंबडीच्या साहसाचे अनेकांनी कौतुक केले आहे तर माकड किती सहनशील आहे असं म्हणत अनेकांनी माकडाची बाजू घेतली आहे. या व्हिडिओत कोणाचीही बाजू निवडा पण बघून तुमच्या चेहऱ्यावर हसू आलं असेलच, हो ना? व्हिडीओ कसा वाटला हे कमेंट करून नक्की कळवा.

मराठीतील सर्व ट्रेंडिंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Viral video chicken fights with monkey animal rivalry makes netizens crazy svs