Naagin Outside ATM Video: लोककथांमध्ये आपण नेहमी ऐकलं आहे. “नाग मारला गेला तर तर नागीण त्याचा बदला घेते!” पण हा किस्सा आता थेट खऱ्या आयुष्यात दिसल्याचं सांगितलं जातंय. सोशल मीडियावर सध्या एक असा व्हिडीओ प्रचंड व्हायरल होत आहे, ज्यात एक नागीण एटीएम मशीनच्या बाहेर थांबलेली दिसते. त्यामुळे एक व्यक्ती एटीएमच्या आत अडकलेली असून, त्याची बाहेर पडण्याची हिंमत होत नाही. दृश्य इतकं थरारक आहे की, पाहणाऱ्यांच्या अक्षरशः अंगावर काटा येतो. या घटनेचा व्हिडीओ आता सोशल मीडियावर व्हायरल होतोय. नेमकं काय घडलं सविस्तर जाणून घेऊया…
नागिणीचा पहारा
ही घटना सोशल मीडियावर @Leo_Mkd83 या एक्स (Twitter) युजरकडून शेअर करण्यात आली आहे. कॅप्शनमध्ये लिहिलं आहे, “फिल्ममध्ये पाहिलं होतं, आता खरं पाहा! नागीण एटीएमच्या बाहेर उभी आहे, बदला घेण्यासाठी!” व्हिडीओत दिसतंय की एक नागीण उभी राहून आणि एटीएमच्या काचेच्या दाराकडे बारकाईने बघत राहते. तिची हालचाल पाहून कोणाच्याही अंगावर काटा येईल. व्हिडीओ पाहून तुम्हालाही धक्का बसेल.
भीतीने एटीएममध्येच थांबली व्यक्ती
त्या एटीएममध्ये पैसे काढायला गेलेला एक माणूस, नागिणीला पाहताच एवढा घाबरला की, तो बाहेर पडायलाच तयार झाला नाही. त्यानं एटीएमचं दार बंद केलं आणि तो आतून लॉक करून बसला. स्थानिक लोकांनी नागिणीला पळवण्याचा प्रयत्न केला; पण ती एक इंचही तिथून हलली नाही. अखेर जवळपास पाच तासांनी वन विभागाला माहिती देऊन, त्यांना बोलावण्यात आलं आणि त्यांच्या मदतीनं नागिणीला सुरक्षितरीत्या पकडण्यात आलं.
लोकांमध्ये चर्चेचा विषय!
हा व्हिडीओ पाहून लोकांच्या अंगावर काटा आल्याचं कमेंट्समध्ये स्पष्ट दिसतंय. काही लोक म्हणतात, “ही बदला घेणारी नागीण खरी आहे का?” तर काहींनी याला अंधश्रद्धेचा भाग म्हणत त्याकडे वैज्ञानिक दृष्टिकोनातून बघण्याचा सल्ला दिला आहे. तथापि, व्हिडीओतील नागिणीची शांत, निर्धारी मुद्रा पाहून अनेकांना हा प्रसंग सिनेमातलाच एखादा सीन वाटत आहे.
येथे पाहा व्हिडीओ
ही घटना खरी असो वा योगायोग; पण इतकं नक्की की, या व्हिडीओनं लोकांच्या मनात पुन्हा एकदा जुन्या ‘नाग-नागीण बदला’ कथांचा थरार जागवला आहे.
(टीप : या वृत्तातील सर्व माहिती सोशल मीडिया स्रोतांवर आधारित आहे. त्यातील कोणत्याही प्रकारच्या दाव्याची लोकसत्ता पुष्टी करीत नाही.)