Viral Video: एखादं नवीन गाणं प्रदर्शित झालं रे झालं की, सोशल मीडियावर ते खूप चर्चेत येतं. त्या गाण्यावर लोक अनेक रील्स, व्हिडीओ बनवतात. अगदी लहानांपासून ते वृद्धांपर्यंत अनेकांना रील्स बनवल्याशिवाय राहवत नाही. सध्या ‘सुंदरी सुंदरी’ हे गाणं खूप चर्चेत आहे; ज्यावर अनेकांनी रील्स बनवल्या आहेत. आता अशाच एका चिमुकलीचा डान्स तुफान व्हायरल होतोय; जो पाहून तुम्हीदेखील कौतुक कराल.

लहान मुलं खूप निरागस आणि निर्मळ असतात. कारण त्यांना आपण जे सांगतो, जे शिकवतो, त्याच गोष्टी ते लक्षपूर्वक पाहतात आणि करतात. हल्लीचे पालक मुलं त्रास देऊ लागली की, त्यांच्या हातात मोबाईल देतात. त्यांना सोशल मीडियावरील रील्स, गाणी, विविध व्हिडीओ दाखवतात. मग काय या सर्व मनाला भुलवणाऱ्या गोष्टी पाहिल्यावर त्यांनादेखील या सर्व गोष्टींचे व्यसन लागतं. अनेक पालक तर आपल्या मुलांनीदेखील इतरांसारखा अभिनय करावा, डान्स करावा यासाठी त्यांना या सर्व गोष्टी शिकवतात. दरम्यान, आता देखील अशाच एका चिमुकलीचा व्हिडीओ व्हायरल होतोय जो सध्या खूप चर्चेत आहे.

या व्हायरल व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता, एक लहान मुलगी काळ्या रंगाचा सुंदर ट्रेस घालून ‘सुंदरी सुंदरी’ गाण्यावर डान्स करताना दिसत आहे. यावेळी त्या मुलीचा डान्स, त्यातील स्टेप्स आणि चेहऱ्यावरचे हावभाव खूप लक्षवेधी आहेत. सध्या हा व्हिडीओ खूप चर्चेत आहे.

या व्हिडीओ इन्स्टाग्रामवरील @adira_chavan या अकाउन्टवर शेअर करण्यात आला असून यावर आतापर्यंत एक मिलियनहून अधिक व्ह्यूज आणि हजारो लाइक्स मिळाल्या आहेत. तसेच तसेच यावर अनेक युजर्स कमेंट्स करताना दिसत आहेत.

पाहा व्हिडीओ:

एकाने लिहिलंय की, “खूपच छान केलास”, तर दुसऱ्याने लिहिलंय की, “छोटी सुंदरी आहे ही”, तर तिसऱ्याने लिहिलंय की, “एकच नंबर”