Viral Video: प्रत्येक वाहनचालकासाठी त्यांची बाईक म्हणा किंवा कार प्रिय असते. सणासुदीला बाइक आणि कारला ओवाळणे, हार घालणे किंवा काही जण तर वाढदिवसदेखील साजरा करतात. एकूणच वाहनचालक त्यांच्या गाड्यांना खूप जपतात. वाहनाच्या एखाद्या तरी पार्टचे नुकसान झाले की, यांना असह्य होते. तर आज सोशल मीडियावर असाच एक व्हिडीओ व्हायरल होत आहे, ज्यात प्रवासादरम्यान साइड मिरर तुटल्याने एका व्यक्तीने अगदीच मजेशीर जुगाड केलेला दिसून येत आहे.

व्हिडीओमध्ये रस्त्यावर सिग्नल लागलेला असतो आणि एक इलेक्ट्रिक कार तेथे उभी असते. पण, त्याच्या गाडीचा एक साइड मिरर तुटलेला असतो. तर यावर एक जुगाड म्हणून चालक मजेशीर गोष्ट करतो. ट्रॅफिकमध्ये अडकलेल्या एका अज्ञात चालकाने हे मजेशीर दृश्य त्याच्या मोबाइलमध्ये कैद करून घेतलं आहे. नक्की काय जुगाड करण्यात आला आहे, एकदा व्हायरल व्हिडीओतून तुम्हीसुद्धा बघा.

हेही वाचा…VIDEO: अवघ्या काही सेकंदात तोंडाने काढला विविध वाद्यांचा आवाज; अनोख्या कलेला प्रवाशांनी दिली दाद

व्हिडीओ नक्की बघा…

व्हायरल व्हिडीओत तुम्ही पाहिलं असेल की, प्रवासादरम्यान वाहनचालकाच्या गाडीचा साइड मिरर तुटलेला असतो. पण, या जागी नवीन आरसा वापरण्याऐवजी चालकाने प्लास्टिकचा गुलाबी रंगाचा आरसा तुटलेल्या साइड मिररच्या जागी चिटकवलेला दिसतो आहे. तसेच आश्चर्याची गोष्ट अशी की, हा गुलाबी रंगाचा प्लास्टिकचा आरसा साइड मिररपेक्षा खूपच लहान आहे. तसेच गाडीला गुलाबी आरसा लावल्यामुळे ट्रेंडमध्ये असणारे गुलाबी साडी गाणं व्हिडीओच्या बॅग्राऊंडमध्ये लावण्यात आलं आहे.

प्रवासादरम्यान ड्रायव्हिंग करताना आपली गाडी दुसऱ्या गाडीला धडकू नये यासाठी अनेक चालक नेहमी काळजी घेत असतात. कारण गाड्या एकमेकांना धडकतात आणि मग वाहनांचे नुकसान तर होतेच, पण त्याचबरोबर वाहनचालकांमध्ये वादही होतात. त्यामुळे प्रवासादरम्यान तुटलेल्या साइड मिररमुळे स्वतःच्या गाडीचे नुकसान होऊ नये म्हणून बहुदा व्यक्तीने हा जुगाड केला असावा. सोशल मीडियावर हा व्हिडीओ @jibran_jazzy या इन्स्टाग्राम अकाउंटवरून शेअर करण्यात आला आहे. नेटकरी हा व्हिडीओ पाहून देशी जुगाड, क्विक फिक्स (quick fix), हॅक आदी विविध कमेंट व्हिडीओखाली करताना दिसून आले आहेत.