Viral Video: समाजमाध्यमांवर दररोज लाखो व्हिडीओ सतत व्हायरल होत असतात. यात गाणी, अभिनय अशा तसेच डान्सच्या व्हिडीओंची संख्या अधिक असते. यातील काही मोजकेच व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड चर्चेत येतात अन् नेटकऱ्यांची पसंती मिळवतात. या व्हिडीओंमुळे व्हिडीओतील कला सादर करणाऱ्या व्यक्तीचे संपूर्ण आयुष्य बदलून जाते. सध्या असाच एक व्हिडीओ सोशल मीडियावर खूप चर्चेत येतोय, ज्यातील तरूणी सुंदर डान्स करताना दिसत आहे.
‘नटरंग’ या मराठी चित्रपटातील ‘नटरंग उभा’ हे गाणं आजही प्रेक्षकांच्या स्मरणात आहे. हे गाणं कुठेही ऐकलं की, आपले पाय आपोआप थिरकायला लागतात. सोशल मीडियावर वारंवार या गाण्यावर डान्स करणाऱ्या नेटकऱ्यांचे व्हिडीओ चर्चेत येतात. यापूर्वी देखील या गाण्यावर डान्स करणाऱ्या कलाकाराचे सुंदर डान्स व्हायरल झाले होते. आताही असाच एक व्हिडीओ सोशल मीडियावर चर्चेत आला आहे.
या व्हायरल व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता, एक तरूणी ‘नटरंग उभा’ या गाण्यावर जबरदस्त डान्स करताना दिसतेय. यावेळी तिच्या हटके डान्स स्टेप्स अन् चेहऱ्यावरील हावभाव तुमचेही लक्ष वेधून घेतील. तिच्या या धमाकेदार डान्सचे सोशल मीडियावर नेटकरी प्रचंड कौतुक करताना दिसत आहेत.
पाहा व्हिडीओ:
इन्स्टाग्रामवरील @manasvi_mane_skdc या अकाउन्टवर शेअर करण्यात आल्या असून एक मिलियनहून अधिक व्ह्यूज आणि लाखो लाइक्स मिळाल्या आहेत. तसेच अनेक युजर्स तिच्या व्हिडीओवर कमेंट्स करताना दिसत आहेत. एकाने लिहिलंय की, “एकच नंबर ताई”. दुसऱ्याने लिहिलंय की, “याला बोलतात डान्स”, तर तिसऱ्याने लिहिलंय की, “खूप सुंदर डान्स केला राव”