Viral Video: प्रत्येक बिल्डिंग, घर, बंगला वा फार्महाऊस यांची रचना करताना प्लॅनिंग केलं जातं. घर आतून व बाहेरून कसं खास दिसेल याकडे विशेष लक्ष दिलं जातं. आज सोशल मीडियावर अशाच एका घराचा व्हिडीओ व्हायरल होत आहे; जो पाहून तुम्ही पोट धरून हसाल आणि या घराची रचना करणाऱ्या व्यक्तीच्या कल्पनेला सलामदेखील कराल.

व्हिडीओत एक घर दिसतं आहे. इतर घरांप्रमाणे या घरालाही खिडक्या, बाल्कनी व दरवाजे आहेत. या घराची समोरील बाजू पाहून तुम्ही कौतुक कराल; पण या घराचा कोपरा पाहताच तुम्हाला नवल वाटेल. कारण- घराची मागची बाजू म्हणा किंवा कोपरा अगदी भिंतीप्रमाणे दिसतो आहे. एकदा तुम्हीसुद्धा बघा हा व्हायरल व्हिडीओ.

हेही वाचा…डॉली चहाविक्रेत्याची दुबई सफर; एक कप कॉफी अन् बुर्ज खलिफाची झलक, पाहा VIDEO

व्हिडीओ नक्की बघा…

व्हिडीओत तुम्ही पाहिलं असेल की, एखाद्या भिंतीप्रमाणे या घराची रचना करण्यात आली आहे. पण, या घरामध्ये जाण्याचा रस्ता कुठून आहे हे कळायला मात्र काही मार्ग नाही. सीरियल किंवा चित्रपटाच्या शूटिंगसाठी एखादा सेट उभारला जातो, अगदी त्याचप्रमाणे या बिल्डिंगची रचना केली गेली आहे, असे दिसून येत आहे. पण, नक्की हे घर आहे की भिंत हे गुपित मात्र तसंच राहिलं आहे.

सोशल मीडियावर हा व्हिडीओ @Gulzar_sahab या एक्स (ट्विटर) अकाउंटवरून शेअर करण्यात आला आहे. व्हिडीओ पाहून नेटकरी वेगवेगळे अंदाज करताना दिसत आहेत. एकाने कमेंट केली आहे, “हैदराबादच्या फिल्मसिटीमध्ये अशी घरं असतात.” तर, दुसऱ्याने कमेंट केली आहे, “बहुधा संपूर्ण घर कोसळले असून, केवळ समोरची भिंत उरली असेल.” तर, तिसऱ्याने कमेंट केली आहे, “मला व्हिडीओ पाहून चक्कर येत आहे.” अशा अनेक मजेशीर कमेंटसुद्धा व्हिडीओखाली पाहायला मिळत आहेत.