Viral Video: सोशल मीडियावर डान्स, गाणी, अभिनय करणाऱ्या अनेक कलाकारांचे रील्स व्हायरल होत असतात. त्यातील अनेक जण त्यांच्यातील कलेमुळे खूप चर्चेत येतात आणि प्रसिद्ध होतात. प्रसिद्धी मिळाली की, त्यांच्या कलेला खऱ्या अर्थाने वाव मिळतो. अगदी लहान चिमुकल्यांपासून ते मोठ्यांपर्यंत प्रत्येक वयोगटातील व्यक्तींचा यात समावेश असतो. सध्या यावर एका कुटुंबाचा डान्स व्हिडीओ तुफान व्हायरल होतोय, जो पाहून तुम्हीही अवाक् व्हाल.
सोशल मीडियावर नवनवीन गाणी, डान्स यांचे व्हिडीओ, तसेच विविध प्रकारच्या गोष्टी व्हायरल होत असतात. व्हायरल झालेल्या गाण्यांवर, डायलॉग्ज किंवा डान्स स्टेप्सवर लोक मोठ्या प्रमाणात रील्स बनवताना दिसतात. या चर्चेत असलेल्या गोष्टींवर अनेक सेलिब्रिटीदेखील रील्स बनवतात. सध्या सोशल मीडियावर संजू राठोडचं ‘सुंदरी सुंदरी’ हे गाणं खूप चर्चेत आहे, ज्याच्यावर लाखो युजर्स रील्स बनवताना दिसत आहेत.
या व्हायरल व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता की, एका घरामध्ये आई-वडिल आणि त्यांचा लहान मुलगा ‘सुंदरी सुंदरी’या गाण्यावर जबरदस्त डान्स करत आहेत. या तिघांच्या प्रत्येक डान्स स्टेप्स आणि चेहऱ्यावरील हावभाव लक्ष वेधून घेत आहेत. त्यांचा हा भन्नाट डान्स सोशल मीडियावरही खूप व्हायरल होत आहे.
हा व्हिडीओ इन्स्टाग्रामवरील @kakade.sanjay या अकाउंटवर शेअर करण्यात आला असून, या व्हिडीओला आतापर्यंत तीन मिलियनहून अधिक व्ह्युज आणि दोन लाखाहून अधिक लाइक्स मिळाल्या आहेत. तसेच या व्हिडीओवर अनेक युजर्स कमेंट्स करताना देखील दिसत आहेत.
पाहा व्हिडीओ:
एका युजरने लिहिलंय की, “गाण्याचा परफॉर्मन्स पेक्षा तुमचा फॅमिली मधील जो आनंद घेण्याची पद्धत आणि उत्साह आहे तो खूपच छान आहे”, तर दुसऱ्या युजरने लिहिलंय की, “”, तर तिसऱ्याने लिहिलंय की, “नुसता धुरळा”
