सोशल मीडियावर एक मजेदार व्हिडीओ व्हायरल होत आहे ज्यामध्ये एक भारतीय व्यक्ती ट्रेनमध्ये ‘जुगाड’ सीट बनवताना दिसत आहे. इन्स्टाग्रामवर काही दिवसांपूर्वी ‘memes.bks’ नावाच्या मिम पेजद्वारे व्हिडीओ शेअर करण्यात आला होता, ज्यामध्ये खालील कॅप्शन होते, “तुम्ही भारतीय मनाशी जुळू शकत नाही (U can’t match with Indian mind)”. हा व्हिडीओ ७३,००० हून अधिक व्ह्यूज आणि ७ हजाराहून अधिक लाईक्ससह व्हायरल झाला आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

काय आहे व्हायरल व्हिडीओमध्ये?

व्हिडीओतील माणसाला ट्रेनमध्ये जागा मिळू शकली नाही आणि ट्रेनचा डबा पूर्णपणे भरलेला आहे आणि जमिनीशिवाय झोपायला जागा नाही. यावेळी त्याला एक अभिनव कल्पना सुचली. त्याने बेडशीट घेतली आणि त्याचे एक टोक एका बाजूच्या सीटला आणि दुसरे दुसऱ्या बाजूच्या सीटला बांधले. यामुळे कोचच्या पॅसेजचा भाग एका सीटमध्ये रूपांतरित होतो. त्यानंतर तो त्याच्या तात्पुरत्या सीटवर चढताना दिसतो. ज्या ठिकाणी प्रवाशांचे सामान ठेवले जाते त्या भागावर पाय पसरत तो माणूस झूल्यामध्ये आरामात झोपू शकतो.

( हे ही वाचा: Airtel वापरकर्त्यांसाठी शेवटची संधी! ‘हे’ रिचार्ज करा आणि वाचवा पैसे! )

नेटीझन्सच्या प्रतिक्रिया

तो माणूस काय करतोय हे पाहण्यासाठी जवळ बसलेले सर्व प्रवासी वळले आणि स्तब्ध झाले. त्यांना काय प्रतिक्रिया द्यावी हे समजले नाही.

परंतु व्हिडीओ पाहणाऱ्या नेटिझन्सना त्यावर चांगलेच हसू आले आणि हसणाऱ्या इमोजींनी टिप्पण्यांचा पूर आला.

मराठीतील सर्व ट्रेंडिंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Viral video man didnt get a seat in the train so he made my own seat by own jugaad ttg