Airtel वापरकर्त्यांसाठी शेवटची संधी! ‘हे’ रिचार्ज करा आणि वाचवा पैसे!

एअरटेलने प्रीपेड प्लॅनच्या किमती २५ टक्क्यांपर्यंत वाढवून ग्राहकांना मोठा झटका दिला आहे. हे दर २६ नोव्हेंबरपासून लागू होतील.

airtel plan hike
सुधारित एअरटेल रिचार्ज योजना या शुक्रवारपर्यंत लागू होणार नाहीत. (फोटो: Indian Express )

देशातील सर्वात मोठी टेलिकॉम कंपनी असलेल्या एअरटेलने प्रीपेड प्लॅनच्या किमती २५ टक्क्यांपर्यंत वाढवून ग्राहकांना मोठा झटका दिला आहे. कंपनीचे प्लॅन आता ५०१ रुपयांपर्यंत महाग झाले आहेत, यामुळे ग्राहकांमध्ये तणाव वाढला आहे. एअरटेलचे नवीन रिचार्ज प्लॅन २६ नोव्हेंबरपासून लागू होतील. आता या स्थितीत तुम्ही असं काय केलं पाहिजे की या वाढीमुळे तुमच्यावर परिणाम होणार नाही किंवा तुम्ही अल्प काळ टिकू शकता ते जाणून घ्या.

वाढलेल्या किमतींचा तुमच्यावर परिणाम होणार नाही

सुधारित एअरटेल रिचार्ज योजना या शुक्रवारपर्यंत लागू होणार नाहीत. म्हणजेच, तुमच्याकडे अजून ३ ते ४ दिवस आहेत, ज्यामध्ये तुम्ही कंपनीच्या वेबसाइट, एअरटेल थँक्स अॅप किंवा इतर कोणत्याही ऑनलाइन रिचार्ज पेमेंट अॅपवरून जुन्या किमतींवर रिचार्ज करू शकता. तुम्ही ३६५ दिवसांच्या वैधतेसह रिचार्ज केल्यास, तुम्ही ही दरवाढ एका वर्षासाठी टाळू शकता. चांगली गोष्ट म्हणजे तुम्ही या ३-४ दिवसांत रिचार्ज केल्यास जुन्या किमतीचा रिचार्ज प्लॅन तुमच्या खात्यात जोडला जाईल आणि सध्याचा पॅक संपताच लागू होईल.

( हे ही वाचा: एअरटेलने २० टक्क्यांनी दरात केली वाढ; ‘आर्थिक आरोग्यासाठी’ निर्णय! )

तुम्ही आता तुमचा एअरटेल नंबर रिचार्ज केल्यास तुम्हाला किती पैसे द्यावे लागतील यावर एक झटकन नजर टाकूया:

७९ एंट्री-लेव्हल प्लॅन: २८ दिवसांच्या वैधतेसह रु. ६४ टॉकटाइम आणि २०० MB डेटा ऑफर करतो.

१४९ रुपयांचा प्लॅन: २८ दिवसांच्या वैधतेसह अमर्यादित व्हॉइस कॉल, २GB डेटा आणि १०० SMS दररोज ऑफर करतो.

२१९ रुपयांचा प्लॅन: २८ दिवसांच्या वैधतेसह अमर्यादित व्हॉइस कॉल, दररोज १GB डेटा आणि १०० SMS दररोज ऑफर करतो.

२४९ रुपयांचा प्लॅन: २८ दिवसांच्या वैधतेसह अमर्यादित व्हॉइस कॉल, दररोज १.५ GB डेटा आणि दररोज १०० SMS ऑफर करतो.

२९८ रुपयांचा प्लॅन: २८ दिवसांच्या वैधतेसह अमर्यादित व्हॉइस कॉल, दररोज २GB डेटा आणि १०० SMS दररोज ऑफर करतो.

३९९ रुपयांचा प्लॅन: ५६ दिवसांच्या वैधतेसह अमर्यादित व्हॉइस कॉल, दररोज १.५ GB डेटा आणि १०० SMS दररोज ऑफर करतो.

४४९ रुपयांचा प्लॅन: ५६ दिवसांच्या वैधतेसह अमर्यादित व्हॉइस कॉल, दररोज २GB डेटा आणि १०० SMS दररोज ऑफर करतो.

३७९ रुपयांचा प्लॅन: ८४ दिवसांच्या वैधतेसह अमर्यादित व्हॉइस कॉल, एकूण ६GB डेटा आणि १०० SMS दररोज ऑफर करतो.

५९८ रुपयांचा प्लॅन: ८४ दिवसांच्या वैधतेसह अमर्यादित व्हॉइस कॉल, दररोज १.५ GB डेटा आणि १०० SMS दररोज ऑफर करतो.

६९८ रुपयांचा प्लॅन: ८४ दिवसांच्या वैधतेसह अमर्यादित व्हॉइस कॉल, दररोज २GB डेटा आणि १०० SMS दररोज ऑफर करतो.

१४९८ रुपयांचा प्लॅन: ३६५ दिवसांच्या वैधतेसह अमर्यादित व्हॉइस कॉल, एकूण २४GB डेटा आणि १०० SMS दररोज ऑफर करतो.

२४९८ रुपयांचा प्लॅन: ३६५ दिवसांच्या वैधतेसह अमर्यादित व्हॉइस कॉल, दररोज २GB डेटा आणि १०० SMS दररोज ऑफर करतो.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व लाइफस्टाइल बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Last chance for airtel users recharge this and save money ttg

Next Story
आता रक्तदाब नियंत्रित करणार हातावरील ‘पट्टी’!
ताज्या बातम्या