Viral Video: आई होणं हा प्रत्येक महिलेसाठी जिव्हाळ्याचा विषय आहे. आई होण्याची चाहूल लागल्यापासून ते ९ महिने आणि त्यानंतर बाळाला जन्म देऊन त्याचे पालन पोषण करण्यात घातलेला प्रत्येक क्षण आईच्या काळजाशी जोडलेला असतो. असं म्हणतात, जेव्हा एखादी स्त्री आई होते तेव्हा तिच्या जगण्याला खरा अर्थ मिळतो. परंतु, अनेकदा काही वैद्यकीय कारणांमुळे किंवा इतर कोणत्याही कारणांमुळे काही जोडप्यांना मूल होत नाही. यावर अनेक जण एकमेकांना दोष देतात किंवा घटस्फोट घेऊन नवीन व्यक्तीबरोबर संसार थाटतात. पण, काही जोडपी अशीदेखील आहेत, जी हे सत्य मान्य करून एकमेकांसोबत आयुष्यभर राहतात; तर काही जण आई-बाबा होण्याचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी एखादे मूल दत्तक घेतात. आता असाच एक सुंदर व्हिडीओ समोर आला आहे.
समाजमाध्यमांवर लाखो व्हिडीओ व्हायरल होत असतात, यातील काही व्हिडीओ अनेकांच्या लक्षात राहतील असे असतात. सध्या व्हायरल होत असलेला व्हिडीओ असाच आहे, जो पाहिल्यावर नकळत तुमचेही डोळे पाणावतील. या व्हिडीओवर अनेक नेटकरी कमेंट्स करताना दिसत आहेत.
या व्हायरल व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता, एका महिलेला तिचा पती आवाज देतो. महिला तिच्या रूममधून हॉलमध्ये येते आणि तिच्या पतीकडे पाहून रडायला सुरुवात करते. यावेळी तिच्या पतीच्या हातामध्ये लहान मूल होते, जे त्याने दत्तक घेतले होते. बाळाला पाहून महिला खूप भावनिक होते आणि नंतर त्याला आपल्या मिठीत घेते. मूल होत नाही म्हणून एकमेकांना दोष देणाऱ्या पती-पत्नीपेक्षा मूल नाही होत हे सत्य मान्य करून अनाथ मुलाला दत्तक घेतल्याचे पाहून नेटकरी त्यांचे कौतुक करत आहेत.
हा व्हिडीओ इन्स्टाग्रामवरील @bhannat__news या अकाउंटवर शेअर करण्यात आला असून या व्हिडीओला आतापर्यंत दोन मिलियन्सहून अधिक व्ह्युज आणि लाखो लाईक्स मिळाल्या आहेत. तसेच अनेक नेटकरी यावर कमेंट्स करत आहेत.
पाहा व्हिडीओ:
एकाने लिहिलंय की, “ज्यांना मूल होत नाही त्यांनी असे केले तर अनाथाश्रम पाहायला मिळणार नाहीत”, तर दुसऱ्याने लिहिलंय की, “आई.. शब्द.. देवापेक्षा जास्त मोठा…”, तर तिसऱ्याने लिहिलंय की, “एखाद्या अनाथ बाळाला नवीन आयुष्य दिलं, ह्यापेक्षा मोठं पुण्य काय.”