viral video of cat walking over escalator gone viral | Loksatta

Viral : चपळतेने एस्केलेटवर चढली मांजर, वरती पोहोचणार तितक्यात.. पाहा हा मजेदार व्हिडिओ

एका मांजरीचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे. यामध्ये ती एस्केलटरवर चढण्याचा प्रयत्न करत आहे. मात्र या दरम्यान तिची अवस्था पाहून तुम्हाला चांगलाच हशा पिकेल.

Viral : चपळतेने एस्केलेटवर चढली मांजर, वरती पोहोचणार तितक्यात.. पाहा हा मजेदार व्हिडिओ
मांजर

इंटरनेट हा पोट धरून हसवेल अशा व्हिडिओजचा खजिनाच आहे. अलिकडे माकडाने बाईचे केस ओढल्याचा व्हिडिओ तुफान व्हायरल झाला होता. आता एका मांजरीचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे. यामध्ये ती एस्केलेटरवर चढण्याचा प्रयत्न करत आहे. मात्र या दरम्यान तिची अवस्था पाहून तुम्हाला चांगलाच हशा पिकेल.

एस्केलेटरमुळे मांजर जेरीस

Yoda4ever नावाच्या ट्विटर युजरने हा व्हिडिओ शेअर केला आहे. यामध्ये एक मांजर वर जाण्यासाठी मोठ्या आत्मविश्वासाने भराभरा एस्केलेटरच्या पायऱ्या चढते. पण पायऱ्या खालच्या दिशेने येत असल्याने ती वर जाण्याऐवजी परत खाली पोहोचते. मोठ्या आत्मविश्वासाने तिची चढायची तयारी दिसून येते. जणू सहजरित्या ती एस्केलेटर पार करेल. मात्र एस्केलेटरमुळे ती जेरीस येते. वर जाण्याऐवजी खाली पोहोचते.

(Viral : श्वानाने मित्राला नदीत बुडण्यापासून वाचवले, पण व्हिडिओ पाहून नेटकऱ्यांनी व्यक्त केल्या ‘या’ शंका)

मांजरीचे प्रयत्न अपयशी

एरव्ही गल्ली, बोळांमध्ये, रसत्यांवर वेगाने पळणारी मांजर मात्र एस्केलेटवर चढताना अपयशी होते. पण ती हार मानत नाही. ती परत एस्केलेटरवर चढण्याचा प्रयत्न करते. मात्र त्यापूर्वी एक व्यक्ती तिला वर जाणाऱ्या पायऱ्या असलेल्या एस्केलेटरवर ठेवतो. त्यावेळी मांजर वर पोहोचते. यावेळी ती कुठलीही धावपळ न करता शांततेने एका पायरीवर बसून वर जाते.

हे दृश्य पाहून तुम्हाला खूप हसू येईल. या व्हिडिओला १ दशलक्ष व्ह्यूज मिळाले आहेत आणि त्यावर प्रतिक्रियांचा वर्षाव होत आहे. काहींना या माजरीने खूप हसवले तर काही यूजरने या माजरीची मदत करणाऱ्या व्यक्तीचे कौतुक केले आहे. एका युजरने या मांजरीची लोकप्रिय टॉम अँड जेरी या कार्टून शोमधील टॉमशी तुलना केली आहे.

मराठीतील सर्व ट्रेंडिंग ( Trending ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Next Story
खरे अमिताभ बच्चन कोण सांगा? हा VIRAL VIDEO पाहून कोणीही गोंधळून जाईल!

संबंधित बातम्या

Video: नकली पोशाख घालून ‘तो’ चक्क मगरीजवळ जाऊन झोपला; तिचा पाय ओढला अन् तितक्यात…अंगावर काटा आणेल ‘हा’ क्षण
Video: राणादा लग्नात नाचताना झाला बेभान; जमिनीवर बसला, जोरात हात आपटला अन् तेवढ्यात…
गाय नव्हे माय! निर्दयीपणे कुत्र्याला त्रास देणाऱ्याला गाईने शिकवला धडा; पाहा घटनेचा थरारक Video
‘आजी जाऊ नको ना…’; बाहेर जाणाऱ्या मालकिणीला थांबण्याची विनंती करणाऱ्या कुत्र्याचा भावनिक Video पाहिलात का?
‘मेरा दिल ये पुकारे आजा’ फेम पाकिस्तानी तरुणीला विकायचाय तिचा हिरवा ड्रेस; किंमत आहे तब्बल….

व्हिडिओ

ताज्या बातम्या
मुळा खाल्ल्याने वाढलेले यूरिक ॲसिड झपाट्याने कमी होईल! आचार्य बालकृष्ण यांच्याकडून जाणून घ्या याचा वापर नेमका कसा करावा
मराठमोळ्या अभिनेत्रीने रणवीर सिंगवर कमेंट करताच पुढे अभिनेत्याने काय केलं पाहा? स्वतःच म्हणाली, “…म्हणूनच मी त्याच्यावर”
राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांना हटवण्यासाठी इस्लामपुरमध्ये बंद
Fifa World Cup 2022: उपांत्यपूर्व फेरीत क्रोएशिया पहिल्यांदाच ब्राझीलला हरवण्याचा प्रयत्न करणार
Video : जबरदस्ती घास भरवला, डान्स केला; राखी सावंतच्या अंगात आलं भूत, घाबरुन विकास सावंत स्टोअर रुममध्ये लपला अन्…