Viral Video: माणसाला जसा आनंद होतो, दुःख होते तसंच प्राण्यांनाही होतो फक्त भावना व्यक्त करण्याची त्यांची पद्धत आपल्यापेक्षा थोडी निराळी असते. सारख्या प्रजातीचे प्राणी एकमेकांचे मित्र असतात हे आपण अनेकदा पाहिलं असेल. पण, वेगवेगळ्या जातीचे प्राणी सुद्धा एकमेकांवर जीव ओवाळतात किंवा एकमेकांचे मित्र असतात हे ऐकून जरा आश्चर्यच वाटेल. पण, असं दृश्य तुम्हाला पाहायला मिळालं तर… आज सोशल मीडियावर असाच एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. या व्हिडीओत चिंपांझी एका श्वानाच्या पिल्लाला मिठी मारली आहे.

व्हायरल व्हिडीओ परदेशातील आहे. एका महिलेच्या शेजारी एक चिंपांझी बसलेला दिसून येत आहे. तसेच आजूबाजूला अनेक श्वानांची पिल्ले आहेत. बघता बघता चिंपांझी एका पिल्लाला अलगद उचलतो आणि आपल्या मिठीत घेतो. मिठी घेतल्यानंतर त्याच्यावर प्रेमाचा वर्षाव करतानाही दिसतो. हे पाहून महिला चिंपांझी बरोबर काही तरी संवाद साधताना दिसत आहे. पण, तो व्हिडीओत स्पष्टपणे ऐकू येत नाही आहे. एकदा तुम्हीसुद्धा हा चिंपांझीचा हा प्रेमळ व्हायरल व्हिडीओ.

हेही वाचा…उन्हापासून संरक्षणासाठी सनस्क्रीनचं व्हेंडिंग यंत्र; स्किन टॅनची चिंता आता सोडा, VIDEO तून पाहा कोणत्या देशात आहे ‘ही’ अनोखी सोय

व्हिडीओ नक्की बघा…

वेगवेगळ्या प्रजातीच्या प्राण्यांना आनंदाने एकत्र खेळताना पाहून प्राण्यांबद्दल आपसूकच जिव्हाळा वाटू लागतो. कारण – आपण दररोज जंगलातील प्राण्याचे शिकार करणारे व्हिडीओ पाहत असतो. त्यातच असे व्हिडीओ प्राण्यांमधील माणूसप्रेम दर्शवितात असे म्हणायला हरकत नाही. वेगवेगळ्या पद्धतीचे जीवन जगणारे लोक इतर जातीच्या किंवा समूहाच्या लोकांशी मैत्री करताना अनेकवेळा विचार करतात. पण, व्हायरल व्हिडीओत तुम्ही पाहिलं असेल की, चिंपांझी अगदी प्रेमाने श्वानाच्या पिल्लाला कुरवाळताना दिसत आहे.

सोशल मीडियावर हा व्हायरल व्हिडीओ @historyinmemes या एक्स (ट्विटर) अकाउंटवरून शेअर करण्यात आला आहे. ‘ श्वानाचे पिल्लू पहिल्यांदा पाहिल्यावर चिंपांझीची प्रतिक्रिया पहा’ ; अशी कॅप्शन या व्हिडीओला देण्यात आली आहे. चिंपांझीचा हा प्रेमळ व्हिडीओ जुना असून आज पुन्हा एकदा सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसत आहे. वेगवेगळ्या प्रजातींची ही घट्ट मैत्री वा प्रेम पाहून आपसूकचं तुमच्याही चेहऱ्यावर नक्कीच आनंद आला असेल. एकूणच सोशल मीडियावर या व्हिडीओने अनेकांचे लक्ष वेधून घेतले आहे.