Viral Video : सोशल मीडियावर दर दिवशी अनेक व्हिडीओ व्हायरल होत असतात. काही मजेशीर असतात तर काही आश्चर्यकारक असतात. असाच एक थक्क करणारा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होतोय. या व्हिडीओमध्ये हत्ती आपल्या सोंडेने चित्र काढतोय. आश्चर्य म्हणजे हत्ती हे स्वत:चेच चित्र काढतोय. या व्हिडीओची सगळीकडे चर्चा सुरू आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

या व्हिडीओत तुम्हाला दिसेल की एक हत्ती आपल्या सोंडेने चक्क स्वत:चेच चित्र काढतोय. हा व्हिडीओ पाहून कुणालाही विश्वास बसणार नाही. सध्या हा व्हिडीओ सोशल मीडियावर खूप व्हायरल होत आहे. या व्हिडीओत सोंडेच्या मदतीने हत्ती चित्र काढतोय. हत्तीची ही अनोखी चित्रकला पाहून तुम्हीही थक्क व्हाल. एखाद्या मोठ्या चित्रकाराप्रमाणे हत्ती चित्र काढतोय. हत्तीच्या चित्रकलेचा हा व्हिडीओ अनेक युजर्स आवडलाय.

आणखी वाचा – ब्रिटनचे माजी पंतप्रधान बोरिस जॉन्सन सलग आठव्यांदा बनणार बाबा, सोशल मीडियाद्वारे दिली अपत्याच्या आगमनाची माहिती

हा व्हिडीओ DailyLoud नावाच्या ट्विटर अकाउंटवरुन शेअर करण्यात आलाय. या व्हिडीओवर लाखो व्ह्यूज आले असून कित्येक लोकांनी व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओवर नेटकऱ्यांनी वेगवेगळ्या प्रतिक्रिया दिल्या आहेत. काही नेटकऱ्यांनी हत्तीच्या या आगळ्या वेगळ्या कलेचं कौतुक केलंय.

मराठीतील सर्व ट्रेंडिंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Viral video of elephant draws its drawing with trunk on twitter social media ndj