Viral video: सोशल मीडियावर दररोज असंख्य व्हिडीओ व्हायरल होताना आपण पाहत असतो. यात मजेशीर तसेच डान्सच्या व्हिडीओंची संख्या अधिक असते. कधी मेट्रोत डान्स, तर कधी सार्वजनिक ठिकाणी, कधी रस्त्यांवर फक्त प्रसिद्धी मिळावी यासाठी खेळून अशा लोकं अशाप्रकारचे व्हिडीओ करत असतात. सध्या सोशल मीडियावर असाच एक व्हिडीओ व्हायरल होतोय, ज्यात एका तरुणीनं थेट जीसीबीवर चढून काय केलं पाहाच. हा व्हिडीओ पाहून तुम्हीही अवाक् व्हाल..

रील बनवण्यासाठी हल्ली लोक कोणत्याही थराला जायला तयार असतात. या रील्सच्या नादात आतापर्यंत अनेकांनी आपला जीव गमावला आहे. पण, त्यातूनही लोक धडा घेताना दिसत नाही. लोक रीलसाठी कधी स्वत:चा तर कधी इतरांचा जीवदेखील धोक्यात टाकायला अजिबात घाबरत नाहीत. सध्या अलीकडे लोकांनी परील बणवण्याचे, सोशल मीडियावर फेमस होण्याचे वेड लागले आहे. काही लाइक्स आणि व्ह्युजसाठी हे रील स्टार किळसवाणा प्रकार करून आता हद्द पार करू लागले आहेत. अशा प्रकारचाच एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होतोय

व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की, एक जेसीबी उभा आहे. जेसीबीच्या पुढच्या भागावर एक तरुणी डान्स करताना दिसत आहे. यावेळी तरुणीला पाहण्यासाठी लोकांची गर्दी जमलेली आहे. तरीही तरुणी बिनधास्तपणे डान्स करताना दिसत आहे. व्हिडिओच्या कॅप्शनमध्ये बिहारचा ऑर्केस्ट्रा असल्याचे म्हटले आहे. सध्या हा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड वेगाने व्हायरल होत आहे. हा व्हिडिओ पाहून अनेकजण हैराण झाले आहेत. सोशल मीडियावर व्हायरल झालेला तरुणीचा हा व्हिडीओ पाहून तुम्हीदेखील कपाळावर हात माराल. जकाल तरुणांमध्ये रील्स बनवण्याची प्रचंड क्रेझ आहे. ते कुठेही असले तरी, जे काही करत आहेत ते ते कॅमेऱ्यात कैद करतात आणि नंतर ते विविध सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर पोस्ट करतात. त्यांना रील्स बनवण्याचे इतके वेड आहे की कधीकधी ते अशा गोष्टी करतात ज्यामुळे त्यांचा जीव धोक्यात येतो. मात्र या तरुणीला कसलीही भीती दिसत नाहीये, ती बिनधास्तपणे नाचताना दिसत आहे.

पाहा व्हिडीओ

सोशल मीडियावर व्हायरल झालेला व्हिडीओ jeejaji या इन्स्टाग्राम अकाउंटवरून शेअर करण्यात आला असून नेटकरी मात्र व्हिडीओवर टीका करत आहेत. काही लोक लाइक्स आणि व्ह्यूजच्या शर्यतीत आपला जीव धोक्यात घालण्यासही मागेपुढे पाहत नाहीत. हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला असून नेटकरीही संताप व्यक्त करत आहेत.