Monkey jump on man : मुक्या प्राण्यांनाही वेदना होतात. त्यामुळे त्यांच्याशी हिंसा करणे अंगलट येऊ शकते. अलिकडेच गायीला मारहाण करणाऱ्या एका व्यक्तीचा व्हिडिओ व्हायरल झाला होता. त्यानंतर चवताळलेल्या गायीने व्यक्तीला चांगली अद्दल घडवली होती. त्याला पायाखाली तुडवले होते. आता असाच एक व्हिडिओ व्हायरल झाला आहे. त्यामध्ये एक माणूस माकडाला दगड मारण्याच्या प्रयत्नात असताना त्यावर माकडाने उडी घेतली.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

सोशल मीडियावर माकडाचा हा व्हिडिओ नेटकऱ्यांना पोट धरून हसवत आहे. या व्हिडिओमध्ये एक माणूस माकडाला दडग मारण्याच्या प्रयत्नात असताना माकड त्याच्या अंगावर उडी घेतो. यामुळे तो दनकन खाली पडतो. @gharkekalesh या ट्विटर हँडलने हा व्हिडिओ शेअर केला आहे. व्हिडिओत माणूस माकडाला हाकलताना दिसत आहे. या दरम्यान ही घटना घडते.

(स्मार्टफोन मिळवण्यासाठी तरुणीने उचलले धक्कादायक पाऊल, ट्युशनच्या बहाण्याने रुग्णालयात गेली अन..)

या व्हिडिओला ५ लाख व्ह्यूज मिळाले आहेत. या व्हिडिओवर नेटकऱ्यांनी भरपूर प्रतिक्रिया दिल्या आहेत. एकाने माकडाचे कृत्य पाहून त्यास जॉन सिना असे संबोधले आहे. तर एकाने यास उडते नेकब्रेकर असल्याचे म्हटले. तर एकाने माकडाला केळी देण्याचा सल्ला दिला आहे.

माकडाच्या या व्हिडिओने नेटकऱ्यांमध्ये चांगलाच हशा पिकला आहे. माकडाला छेडणे किंवा त्रास देणे हे अंगलट येऊ शकते. त्यामुळे, त्यांच्यापासून दूरच राहिलेले बरे.

मराठीतील सर्व ट्रेंडिंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Viral video of monkey jump on man tried to hurt him ssb