Shocking video: सोशल मीडियावर व्हिडीओ आणि रील्स बनवून अनेकांनी आपलं आयुष्य बदललं आहे. आज असे लोक लाखो-कोट्यवधी रुपये कमावत आहेत. पण, व्हिडीओ बनविण्याच्या नादात अनेक जण आपला जीव धोक्यात घालतात. अनेकदा अशा घटना घडल्या आहेत; ज्यात व्हिडीओ बनविताना अनेकांना प्राणसुद्धा गमवावे लागलेले आहेत. रेल्वे रुळांवर, समुद्रात, डोंगरावर, चालत्या ट्रेनमध्ये, चालत्या बाईकवर किंवा कारवर लोक स्टंट व्हिडीओ शूट करताना दिसतात; पण काही वेळा त्याचे त्यांना गंभीर परिणामही भोगावे लागतात. अशाच एका तरुणीला आपला जीव धोक्यात घालून रील बनवणं चांगलंच महागात पडलंय. रील बनवण्यासाठी चक्क झाडाच्या टोकावर जाऊन फांदीवर बसली आहे. याचा थरकाप उडविणारा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता, तुम्हाला एक तरुणी एका मोठ्या झाडावर बसलेली दिसत आहे आणि ती तिने आपल्या मोबाईलमध्ये रील्स व्हिडिओ शूट केला आहे.तरुणी झाडाच्या उंच फांदीवर बसलेली आहे त्यानंतर ती विविध पोझ देत आहे आणि झाड तोडू नका यावर बोलताना दिसत आहे.सध्या हा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगला पसंतील आलेला आहे.

सोशल मीडियावर व्हायरल होण्याची क्रेझ इतकी वाढली आहे की, लोकांना काहीही करून व्हायरल व्हायचे आहे. त्यासाठी स्वत:चा व इतरांचा जीव पणाला लावावा लागला तरी चालेल. रीलमाफियांना पोलिस आणि कायद्याची भीती तर नाहीच; पण आपला जीव गमवावा लागण्याचीही भीती राहिलेली नाही. आता आणखी एक धक्कादायक व्हिडीओ व्हायरल होत आहे; ज्यामध्ये एक तरुणी उंच डोंगरावर एका झाडाच्या टोकावर बसून राहून रील बनवत होती.

पाहा व्हिडीओ

सोशल मीडियावर हा व्हिडीओ @Abhimanyu1305 नावाच्या एक्स अकाउंटवरून शेअर करण्यात आला आहे. प्रसिद्धीझोतात येण्यासाठी तरुणाई स्टंट करताना दिसून येते. दिवसेंदिवस निरनिराळे स्टंट करण्याची जणू क्रेझच झाली आहे. सोशल मीडियावर व्हायरल होण्यासाठी लोक अशा प्रकारच्या गोष्टी करताना दिसून येतात. नेटकरीही हा व्हिडीओ पाहून संतापले आहेत. एकानं म्हटलंय, “जीव एवढा स्वस्त असतो का, एक चूक अन् खेळ खल्लास होईल?” तर आणखी एक जण म्हणतोय, “काही क्षणांच्या आनंदासाठी असं नका करू.”

मराठीतील सर्व ट्रेंडिंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Viral video of unique reel location young girl climbs a tree to shoot shocking video goes viral srk