Pune Metro Viral Video:  पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते सिव्हिल कोर्ट ते पिंपरी चिंचवड आणि गरवारे कॉलेज ते रूबी हॉल या दोन योजनांचे लोकार्पण मंगळवारी झाले. यानंतर पुणे मेट्रो सर्वसामान्य पुणेकरांसाठी सुरु झाली. मेट्रोमुळे पुणेकरांचा तासाचा प्रवास काही मिनिटांवर आला आहे. पिंपरी चिंचवडवरुन २५ ते ३० मिनिटांत पुणे शहरात नागरिकांना येता येणार आहे. मेट्रोने प्रवास करणाऱ्या पुणेकरांचा आता वाहतूक कोडींतूनही सुटका होणार आहे. पुणेकर म्हणजे स्वाभिमानी, पुण्यातले लोक स्वत:ला हवं तेच करतात. पुणेकर कुठेही गेले तरी त्यांचा पुणेरी बाणा सोडत नाहीत. पुण्यातही त्यांच्याच मर्जीनं सगळं चालंत, त्यामुळे पुणे तिथे काय उणे असं म्हणतात. दरम्यान अशाच एका पुणेकराचा मेट्रो स्टेशनवरील व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

हा व्हिडीओ बघून तुम्हीही पोट धरुन हसाल, व्हायरल झालेला व्हिडीओ नव्याने पुण्यात सुरु झालेल्या वनाझ ते रूबी हॉल आणि पिंपरी-चिंचवड ते सिव्हिल कोर्ट मार्गांपैकी पिंपरी चिंचवड-सिव्हिल कोर्ट मेट्रो मार्गावरील आहे. सिव्हिल कोर्ट स्थानकावरुन पिंपरी-चिंचवडसाठी सुटणाऱ्या मेट्रोचा हा व्हिडीओ आहे. हा व्हिडीओ लोको पायलेटच्या केबीनच्या दरवाजाजवळ म्हणजेच मेट्रोचा चालक बसतो त्या पहिल्या डब्ब्याजवळ प्लॅटफॉर्मवरुन शूट करण्यात आला आहे. मेट्रोचे दरवाजे बंद होतात.

कोणालाही करता येत नाही ते पुणेकर करु शकतात 

मात्र काही क्षणांमध्ये तिथे पोहोचलेले एक पुणेकर काका दरवाजे बंद असलेल्या या मेट्रोच्या लोको पायलेटच्या केबीनचा दरवाजा ठोठावतात. एकदा नाही तर दोन वेळा हे काका दरवाजा ठोठावतात. त्यानंतर कोण दार ठोठावतंय हे पहायला लोको पायलेट बाहेर येतो तेव्हा हे काका मेट्रोचा दरवाजा उघडण्यास सांगतात. हा लोको पायलेट खरोखर मेट्रोचे सारे दरवाजे उघडतो आणि काका आत जातात. दरवाजे पुन्हा बंद होतात.

पाहा व्हिडीओ

हेही वाचा – VIRAL VIDEO: लोणावळ्याला फिरायला जाताय? थांबा! घाट माथ्यावर दिसला वाघ, एका पर्यटाकाचा…

आतापर्यंत हजारो लोकांनी हा व्हिडीओ पाहिला असून वेगवेगळ्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर शेअर करत आहे. या व्हिडीओखाली अनेकांनी मजेशीर कमेंट्सदेखील दिल्या आहेत. एका युजर्सने लिहलं आहे की, ‘पुणे दर्शन’. दुसऱ्याने कमेंटमध्ये पुण्याच्या मेट्रोमधला अजून एक व्हिडीओ पोस्ट केला आहे

मराठीतील सर्व ट्रेंडिंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Viral video only a punekar has the confidence to knock the door of the loco pilot and ask him to stop the metro to board video viral on social media srk