Viral Video Shows Man Met A Kitten After Work : आपल्यातील अनेकांना प्राणी प्रचंड आवडतात. घरात एकदा तरी पाळीव प्राण्याला घेऊन येणं, त्याचा सांभाळ करणे अशी आपल्यातील अनेकांची इच्छा नक्कीच असेल. हे प्राणीप्रेमी त्या प्राण्याला आपल्या घरातील एक सदस्य म्हणूनच घेऊन येत असतात. पण, हे पाळीव प्राणी घरात घेऊन येण्यामागेसुद्धा एक गोष्ट असते. काहींना रस्त्याकडेला किंवा कचराकुंडीत, तर कोणाला गाडीच्या खाली मांजराचे किंवा श्वानाचे पिल्लू पडलेले दिसते. मग ते या छोट्याश्या पिल्लाला घरी घेऊन येतात आणि त्यांची काळजी घेतात. तर अशीच एक गोष्ट आज सोशल मीडियावर व्हायरल (Viral Video) होत आहे. इन्स्टाग्राम युजर रॅमसे हे दिवसाचे काम संपवून ऑफिसबाहेर निघाले, तेव्हा अलगद त्यांच्या पायाजवळ एक मांजरीचे पिल्लू आले. रॅम यांना काय करावं हे सुचत नव्हतं. तेव्हा हे पिल्लू त्यांच्या पायाभोवती खेळताना, मिठी मारताना आणि पायावर चढून जाण्याचा प्रयत्न करताना दिसून आले आणि मग त्या गोंडस मांजरीच्या पिल्लाला पाहून रॅमसे यांनी तिला पाळण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर त्यांनी काही फोटो व व्हिडीओ शेअर केले आणि इतर युजर्सकडून मांजरीला कसं पाळायचं याचा सल्लादेखील मागितला. हेही वाचा…VIRAL VIDEO : हत्तीने केली पर्यटकांची गंमत; तुरुतुरु धावत आला पुढे अन्… आईचे संरक्षण करणाऱ्या दोन महिन्यांच्या पिल्लाला पाहाच पोस्ट नक्की बघा… मांजरीच्या पिल्लाने निवडलं मालकाला : व्हायरल व्हिडीओत (Viral Video) तुम्ही पाहिलं असेल की, रॅमसेने मांजरीच्या पिल्लासाठी एक पुठ्ठयाचा पलंगदेखील बनवला आहे. तसेच तिला खाण्यासाठी काही पदार्थ, तर अंडसुद्धा उकडवून दिलं आहे. मांजरीचे पिल्लू अनपेक्षितपणे आणि रॅमसेबरोबर लगेचच मैत्री होणे ही गोष्ट पाहून सोशल मीडिया वापरकर्ते रॅमसेला "मांजरीचा बाबा" म्हणताना दिसत आहेत. सोशल मीडियावर ही पोस्ट @OneNerdyOpinion या एक्स (ट्विटर) अकाउंटवरून शेअर केली आहे. तसेच मालकाने आपल्या पाळीव मांजरीच्या पिल्लाबरोबरच्या पहिल्या भेटीचे काही व्हिडीओ, फोटो, सेल्फीदेखील पोस्ट केले आहेत. ही गोष्ट पाहून अनेक युजर्स वेगवेगळ्या कमेंट करताना दिसत आहेत. एका युजरने कमेंट केली आहे की, 'रॅमसेने मांजराला नाही तर मांजराने त्याच्या मालकाला निवडले आहे', तर दुसरा युजर म्हणतोय की, 'एकदा का मांजरीला तुमच्या घरी सुरक्षित वाटले तर ती तुमची साथ कधीच सोडणार नाही'; आदी कमेंट युजर्सनी पोस्टखाली केलेल्या दिसून आल्या आहेत. प्राणी व माणसांचं नातं नकळत कधी, कुठे जोडलं जाईल याचे उत्तम उदाहरण या व्हिडीओतून आज आपल्याला पाहायला मिळालं आहे.