Video Shows Bride Brother Worried About Her Morning Tea : शाळा, कॉलेज किंवा ऑफिससाठी घरातून बाहेर पडण्यापूर्वी अनेकांना एक कप चहा पिण्याची सवय असते. चहा म्हणजे चहाप्रेमींसाठी अगदी जिव्हाळ्याचा विषय. कुठेही गेले तरी ते एक कप चहाचे सेवन केल्याशिवाय त्यांच्या दिवसाची सुरुवातच होत नाही. ही सवय आपल्या कुटुंबातील सदस्यांना हमखास माहितीच असते. तर आज सोशल मीडियावर असाच एक व्हिडीओ व्हायरल होतो आहे, यामध्ये लग्न विधी सुरू असताना बहिणीच्या भावाने त्याच्या भाऊजींना बहिणीची ही खास सवय सांगितली आणि उपस्थितांमध्ये एकच हशा पिकला .

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

व्हायरल व्हिडीओ (Video) लग्नसमारंभातील आहे. मुस्कान आणि तनुज यांचे लग्नविधी सुरू असतात. लग्नात विधीदरम्यान भटजी काही गोष्टी सांगत नवऱ्याला ‘लक्षात ठेव, विसरून जाऊ नकोस असे आवर्जून म्हणतात आणि नवरा-नवरी ते गपचूप ऐकताना दिसत आहेत. यादरम्यान मुस्कानचा भाऊ ‘सकाळी तिला चहा हवा असतो’ असे हसत सांगताना दिसतो. हे वाक्य उचलून धरून भटजी, ‘बघ, सकाळी चहा बनवून द्यावा लागेल तूला’ असे म्हणताना दिसतात. यावर मुस्कानचा नवरा काय म्हणतो हे व्हायरल व्हिडीओतून तुम्हीसुद्धा नक्की बघा…

व्हिडीओ नक्की बघा…

व्हायरल व्हिडीओत (Video) तुम्ही पाहिले असेल की, नवरीला सकाळी चहा हवा असतो हे ऐकताच नवरासुद्धा अगदी प्रेमाने, कोणतीही तक्रार न करता ओके (Okay) म्हणतो. हे ऐकून उपस्थितांमध्ये एकच हशा पिकला आणि नवरीसुद्धा लाजली. लग्नसमारंभात उपस्थित एका अज्ञात व्यक्तीच्या मोबाइलमध्ये हा व्हिडीओ नकळत शूट झाला. हा व्हिडीओ नवरीने पाहिला आणि स्वतःच्या अकाउंटवर ‘जेव्हा माझ्या भावाला माझ्या सकाळच्या चहाची चिंता वाटते’ या खास मजकुरासह शेअर केला आहे, जे पाहून तुम्हालाही कौतुक वाटेल.

बहिणीचा भाऊ खूपच क्युट आहे…

सोशल मीडियावर व्हायरल होणारा हा व्हिडीओ muskan_tanwar18 आणि fit.si.07 या इन्स्टाग्राम अकाउंटवरून शेअर करण्यात आला आहे. ‘सात वचनांमध्ये आणखी एक वचन जोडले’ ; अशी मजेशीर कॅप्शन तिने व्हिडीओला दिली आहे. व्हिडीओ पाहून नेटकरी बहिणीच्या भावाच्या प्रेमात पडले आहेत आणि ‘जो माणूस आपल्या बहिणीची खूप काळजी घेतो, तो आपल्या पत्नीची किती काळजी घेत असेल याची कल्पना करा’, ‘बहिणीचा भाऊ खूपच क्युट आहे’ आदी कमेंट्स तर काही जण त्यांच्या भावांना कमेंटमध्ये टॅग करताना दिसून आले आहेत.

मराठीतील सर्व ट्रेंडिंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Viral video shows bride brother is worried about her morning tea watch funny scene between marriage asp