वाहन चालवताना किंवा रस्ता ओलंडातना मोबाईल वापरून नये हे सर्वानांच माहित आहे तरीही अनेकजण या नियमाचे उल्लंघन करताना दिसतात. दरम्यान अशाच एका घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर चर्चेत आला आहे. सिंगापूरमध्ये ऑर्चर्ड रोड ओलांडत असताना एका महिला आपल्या फोनमध्ये बघत होती, दरम्यान महिलेला एका कारने जोरदार धडक दिली. हा अपघात व्हिडिओमध्ये कैद झाला आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

ही घटना कारच्या डॅशबोर्ड कॅमेऱ्याने रेकॉर्ड केली. रस्ता ओलांडणारी महिला आपल्या फोनमध्ये मग्न असून ती लाल सिग्नलकडे दुर्लक्ष करून रस्ता ओलांडते अन् हिरवा सिग्नल मिळाल्याने कार पुढे जात असताना ही महिला अचानक कारसमोर येते आणि तिला जोरदार धडक बसते. धडक इतकी जोरदा असते की महिला अक्षरक्ष: काही अंतरावर फेकली जाते.

आघातानंतर, ड्रायव्हर महिलेची स्थिती तपासण्यासाठी पटकन कारमधून बाहेर पडतो. पण ती महिला उठून बसते आणि तिच्या दुखापतींचे मूल्यांकन करण्याऐवजी फोन खराब झाला आहे का ते तपासण्यासाठी फोनकडे धावते. १३ नोव्हेंबरच्या मध्यरात्रीच्या सुमारास ही घटना घडल्याचे इंडिपेंडंट सिंगापूरने सांगितले.

हेही वाचा –लक्ष्य दिव्यांनी उजळले दगडूशेठ गणपती मंदिर! लाडक्या बाप्पाच्या दर्शनासाठी पुणेकरांची गर्दी, पाहा सुंदर Video

@OnlyBangersEth या X खात्याने पोस्ट केलेल्या व्हिडिओला लाखो व्ह्यूज मिळाले आहेत, ज्यामुळे प्रतिक्रियांचा पूर आला आहे. निरीक्षक दर्शकांनी नोंदवले की, कारने धडक दिल्यानंतरही ही मुलीने आधी तिचा फोन तपासला आणि अनेकांनी अशा परिस्थितीत डॅशबोर्ड कॅमेरा असणे किती महत्त्वाचे असू शकते यावर भर दिला.

एका वापरकर्त्याने लिहिले, “गंभीर दुखापत झाल्यानंतर तिचा फोन शोधणे ही तिची पहिली प्रवृत्ती होती.” दुसऱ्या वापरकर्त्याने सांगितले की, “तिने फोनवर असल्याचा फटका बसल्यानंतर तिने पहिली गोष्ट कशी केली, किती वेडेपणा आहे.”

हेही वाचा –गर्भवती महिलेचा थोडक्यात वाचला जीव! रुग्णवाहिकेतील ऑक्सिजन सिलेंडरचा स्फोट, थरारक Video कॅमेऱ्यात कैद

तिसऱ्या व्यक्तीने लिहिले “एकदा तुम्ही तुमच्या घरातून किंवा कोणत्याही आवारातून बाहेर पडल्यावर तुमचा फोन तुमच्या हातात नसावा. हा एक नियम आहे जो तुम्हाला रस्त्यावर सुरक्षित ठेवेल. तुम्ही तुमच्या ज्या ठिकाणी पोहाचायचे आहे तिथे पोहोचल्यानंतर तुम्ही तुमच्या फोनवर उपस्थित राहू शकता किंवा ते खूप महत्वाचे असल्यास, चालणे थांबवा आणि त्याचा वापर करा.”

एका महिन्यापूर्वी, ब्यूनस आयर्समध्ये असाच अपघात कॅमेऱ्यात कैद झाला होता, ज्यामध्ये एका माणसाला वेगवान ट्रेनने धडक दिली होती पण ज्याचा जीव थोडक्यात वाचला.. व्हिडिओमध्ये, त्याच्या फोनमध्ये पाहण्यात मग्न होता आणि चालता चालता तो रेल्वे ट्रॅकवर पोहचतो आणि त्याच क्षणी रेल्वेट्रॅकवर रेल्वे धावताना दिसते ज्याकडे त्याचे लक्षच नसते. सुदैवाने त्याचे ट्रेनकडे लक्ष जाते आणि तो वेळीच मागे सरकतो आणि मोठा अनर्थ टळतो. तरी ट्रेनची धडक त्याला बसते आणि त्याच्या हातातून फोन खाली पडतो. जे घडले त्यामुळे तो माणूस घाबरतो आणि जमिनीवर कोसळतो.

मराठीतील सर्व ट्रेंडिंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Viral video shows car hitting woman distracted by phone the internet is stunned by what she does next snk