Video Shows Little One Enjoying In The Snow : प्रत्येक माणसाची एकच इच्छा असते, ती म्हणजे आपले जीवन आनंदात जावो. पण, तसे बघायला गेलो तर आनंदाची अशी काही व्याख्या नसते. प्रत्येकाचा आनंद वेगवेगळ्या गोष्टींमध्ये असतो. गरीब असो वा श्रीमंत, लहान असो वा मोठा प्रत्येक जण आपल्या परीने आनंदी होण्याचा प्रयत्न करत असतो. आता एका लहान मुलाचे उदाहरण घ्या. त्याच्या हातात तुम्ही एखादे खेळणे किंवा साधे पाच रुपयाचे चॉकलेट जरी दिले तरी त्यांच्या चेहऱ्यावर भलीमोठी स्माईल येते. तर आज असाच एक व्हिडीओ (Video) सोशल मीडियावर व्हायरल होतो आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

हिवाळा सुरू होताच अनेक जण हिलस्टेशनवर फिरायला जाण्याचा प्लॅन करतात. डिसेंबर ते फेब्रुवारी या दरम्यान पर्यटकांना बर्फवृष्टी पाहण्यास मिळते. पांढऱ्या शुभ्र बर्फात फिरण्याची मजा काही वेगळीच असते, त्यामुळे अनेक जण मित्र- मैत्रिणी किंवा कुटुंबाबरोबर शिमला, जम्मू काश्मीर येथे जाऊन बर्फवृष्टीचा आनंद घेतात. बर्फात स्नो मॅन किंवा एकमेकांवर बर्फ मारून मजा-मस्ती करतात. पण, आज एका मुलाने बर्फाचा अगदी वेगळ्या प्रकारे आनंद घेतला आहे. नक्की त्याने काय केले, व्हायरल व्हिडीओतून (Video) तुम्हीसुद्धा बघा…

व्हायरल व्हिडीओत (Video) तुम्ही पाहिले असेल की, तरुण पांढऱ्या शुभ्र बर्फात फिरताना दिसतो आहे. तसेच त्याच्या हातात डक राइस मोल्ड असतो (Duck Rice Mold). या डक राइस मोल्डमध्ये शिजलेला भात किंवा एखादा पदार्थ टाकल्यास तो बदकाच्या पिल्लाच्या आकाराचा दिसतो. तर मुलगा डक राइस मोल्ड घेऊन बर्फाळ प्रदेशात फिरायला जातो आणि त्यात बर्फ टाकतो. बर्फ साच्यात टाकल्यानंतर त्याचा आकार बदकाच्या पिल्लासारखा होतो. हे पाहून मुलगा रस्त्याकडेला असणाऱ्या संरक्षण भिंतीवर बर्फाची बदकाची पिल्ले ठेवण्यास सुरुवात करतो.

व्हिडीओ नक्की बघा…

जीवनातील प्रत्येक क्षणाचा आनंद घ्या…

सोशल मीडियावर व्हायरल होणारा हा व्हिडीओ @trendruiners या इन्स्टाग्राम अकाउंटवरून शेअर करण्यात आला आहे. अनेक नेटकरी हा व्हिडीओ पाहून, “प्रत्येक गोष्टीत आनंद शोधता यायला हवा, जीवनातील प्रत्येक क्षणाचा आनंद घ्या” असे म्हणत या व्हिडीओचे इमोजीसह कौतुक करताना कमेंटमध्ये दिसून आले आहेत. छोट्या छोट्या गोष्टीत दुःखी होण्यापेक्षा या मुलाप्रमाणे छोट्या-छोट्या गोष्टीत आपण आनंद शोधायला हवा, याचे उत्तम उदाहरण दाखवणारा हा व्हिडीओ आहे असे म्हणायला हरकत नाही.

मराठीतील सर्व ट्रेंडिंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Viral video shows little one enjoying in the snow with duck rice mold asp