Viral video: भारतात सर्वात जास्त महत्त्व संस्कृतीला दिलं जातं. शिवाय भारतीय संस्कृतीमध्ये लग्नाला जन्मोजन्मीचं नातं मानलं जातं. लग्न झाल्यानंतर पती पत्नी कायमसाठी एकमेकांचे होऊन जातात. लग्नात सात जन्म एकत्र राहाण्याचं वचन पती पत्नी एकमेकांना देतात. पण आता भारतात देखील घटस्फोटाच्या संख्येत मोठी वाढ होताना दिसत आहे. सांगायचं झालं तर, पाश्चिमात्य देशांच्या तुलनेक भारतात घटस्फोटाचं प्रमाण फार कमी आहे. पण गेल्या काही वर्षांपासून भारतात घटस्फोटाच्या प्रमाणात वाढ होताना दिसत आहे.
सध्याच्या काळात पती-पत्नी यांच्यातील वाद वाढलेले दिसून येतात. ज्यामुळे बरेच लोक घटस्फोटाचा मार्ग पत्करतात. घटस्फोटाची प्रक्रिया दीर्घ काळ चालणारी असते. त्यामुळे जेव्हा ही प्रक्रिया पूर्ण होते तेव्हा संबंधित सुटकेचा नि:श्वास सोडतात. अलीकडे एक व्हिडिओ सोशल मीडियावर बराच व्हायरल होत आहे. या व्हिडिओत युवक घटस्फोटानंतर सेलिब्रेशन करताना दिसतो. या आनंदापूर्वी तो दुधाने आंघोळ करतो, त्यानंतर नवीन कपडे आणि बूट घालतो. मग केकही कापतो. सोशल मीडियावर या युवकाच्या व्हिडिओची बरीच चर्चा सुरू आहे.
व्हिडिओमध्ये दिसते की, युवकाची आई त्याच्यावर दूध ओतून त्याचा अभिषेक करत आहे. हिंदू संस्कृतीत अभिषेक हा शुद्धीकरण आणि नव्या सुरुवातीचा प्रतीक मानला जातो. त्यानंतर हा तरुणी ‘सुखी घटस्फोट’ असे लिहिलेल्या चॉकलेट केकजवळ येतो आणि तो केक कापतो. केकवरच त्याने लिहिले होते की, “मी माझ्या माजी पत्नीला १२० ग्रॅम सोने आणि १८ लाख रुपये दिले आहेत.” तसेच व्हिडिओच्या कॅप्शनमध्ये त्याने लिहिले, “कृपया आनंदी रहा, स्वतःचा सन्मान करा. १२० ग्रॅम सोने आणि १८ लाख रुपये दिले आहेत, घेतले नाहीत. आता मी सिंगल, खुश आणि आजाद आहे. माझं जीवन, माझे नियम!”
पाहा व्हिडीओ
सोशल मीडियावर हा व्हिडीओ iamdkbiradar नावाच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरुन शेअर करण्यात आला आहे. यावर आता नेटकरीही व्हिडीओवर वेगवेगळ्या प्रतिक्रिया देत आहेत. लोकंही तरुणाच्या निर्णयाचं कौतुक करत आहेत. एकानं म्हंटलंय की, “बरोबर केलंस भावा एकटा जीव सदाशीव” तर आणखी एकानं, “काय चाललंय हे आजकाल” अशी प्रतिक्रिया दिली आहे.