Viral Video Shows House Designed With Motor Parts : स्वप्नातले घर खरेदी करण्याची आपल्या प्रत्येकाची इच्छा असते. पण ते घर स्वछ व सुंदर दिसावे आणि त्यासाठी आपण स्वतः मेहनत घ्यावी असे प्रत्येकाला वाटते. म्हणून आपल्यातील अनेक जण घर विविध वस्तुंनी सजवतात. काही जण घराला मॉडर्न तर काही जण घराला रेट्रो लुक देतात. पण, आज सोशल मीडियावर असा एक व्हिडीओ व्हायरल ( Viral Video) होत आहे. यामध्ये एका बाईक आणि कार प्रेमीने अनोख्या पद्धतीत घराची रचना केली आहे जी तुम्हाला विचार करायला नक्कीच भाग पाडेल.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

व्हायरल व्हिडीओ केरळचा आहे. सोशल मीडियाचा इन्फ्लुएन्सर प्रियम सारस्वतने केरळमधील एका बाईकप्रेमीच्या घराला भेट दिली. घराची सजावट करण्यासाठी त्याने अगदी विशेष पध्दतीने, मोटारसायकलचे पार्ट्स वापरून घराचा प्रत्येक कोपरा डिझाइन केला . अगदी घराबाहेरचे लेटर बॉक्स, ड्रॉइंग रूम ते स्वयंपाक घरापर्यंत, प्रत्येक जागेला बाइकच्या विविध पार्ट्सची जोड देऊन सजावट केली आहे. नक्की कशाप्रकारे घर सजवले आहे व्हायरल व्हिडीओतून तुम्हीसुद्धा बघा (viral Video) …

हेही वाचा…‘आई ती आईच…’ १० पावले चालल्यावर पिल्लाला मागे वळून पाहणाऱ्या मांजरीने जिंकली नेटकऱ्यांची मने; पाहा हृदयस्पर्शी Viral Video

व्हिडीओ नक्की बघा…

व्हायरल व्हिडीओत तुम्ही पहिले असेल की, घराबाहेर Yamaha RX100 चा टँक वापरून लेटरबॉक (मेलबॉक्स) तयार केला आहे. लिव्हिंग रूममध्ये एक स्टाइलिश टेबल तयार करण्यासाठी बाईकच्या इंजिन माउंटचा (engine mounts) वापर केला आहे. पिवळ्या बजाज चेतक स्कूटरचे सोफ्यात रूपांतर केले आहे तर एक जुने ॲम्बेसेडर मॉडेल प्रवेशद्वारावर ठेवले आहे, स्विफ्ट डिझायरच्या प्रेशर प्लेटने घड्याळ, झुंबर म्हणून सायकलची चौकट, दरवाजाच्या दिव्याच्या बदल्यात बजाज चेतकचा हेडलाईट भिंतीला जोडण्यात आला होता.

टॉवेल ठेवण्यासाठी महिंद्राचे स्टीयरिंग व्हील

स्वयंपाकघरात नट बोल्ट आणि स्पॅनर सारख्या स्पेअर पार्ट्सने जेवण जेवण्यासाठी टेबल सुद्धा बनवला होता. टायरचे वॉश बेसिन, टॉवेल ठेवण्यासाठी महिंद्राचे स्टीयरिंग व्हील, रेफ्रिजरेटरची रचना फोक्सवॅगन कोम्बी (Volkswagen Kombi) सारखी करण्यात आली होती. त्याचप्रमाणे बाइकस्वाराने त्याला गाड्या चालवण्याबद्दल मिळालेले काही प्रतिष्ठित पुरस्कार सिद्ध दाखवले. या पुरस्कारांमध्ये गोव्याच्या मुख्यमंत्र्यांच्या हस्ते त्यांचा सत्कार करताना सुद्धा फोटो होता. नेटकरी सुद्धा हा व्हिडीओ पाहून थक्क झाले आहेत. घरापेक्षाही त्याची आवड ही प्रेरणा देऊन जाते आहे, लेजेंड(Legend), काहीजण याला वेड म्हणतात, तर काहीजण याला वेडेपणा म्हणतात- पण मला हे प्युअर पॅशन वाटते आहे. सोशल मीडियावर हा व्हिडीओ @priyamsaraswat या इन्स्टाग्राम अकाउंटवरून शेअर करण्यात आला आहे.

मराठीतील सर्व ट्रेंडिंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Viral video shows man use spare motorbike parts to design every corner of his house asp