Video Shows Two Pet Dogs Join Grandma’s Bhajan : घरात पाळीव प्राण्यांना आणण्यास मोठ्या मंडळींकडून नेहमी नकार दिला जातो. कारण- घरात एखादा पाळीव प्राणी आणला, तर आपली जबाबदारी खूप वाढते. एखाद्या लहान मुलाप्रमाणे त्यांची काळजी घ्यावी लागते. त्यामुळे बरेच लोक इच्छा असूनही घरात प्राणी पाळत नाहीत. असे असले तरीही काही जण हट्टापायी घरात या प्राण्यांना आणतात. मग काही दिवसांतच मोठी मंडळी त्यांना आपलंसंसुद्धा करतात आणि घरात ते सगळ्यांचे लाडके होतात. तर, हेच दृश्य दाखविणारा आजचा व्हायरल व्हिडीओ (Video) आहे, जो पाहून तुमच्या चेहऱ्यावरही आनंद येईल.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

पूर्वी भजन, जुनी गाणी म्हटलं की, आपल्यातील अनेकांना कंटाळा यायचा. पण, बदलत्या काळात अनेकांना भजन, कीर्तन ऐकायला आणि मंदिरांना भेट द्यायला पुन्हा एकदा आवडायला लागले आहे. तर व्हायरल व्हिडीओतसुद्धा असेच काहीसे पाहायला मिळाले आहे. गॅलरीत बसून आजी भजन गाते आहे आणि तिचे भजन ऐकायला घरातील दुसरे-तिसरे कोण नाही, तर त्यांच्या घरातील पाळीव श्वान आले आहेत. आजी भजन गाताना पाळीव श्वानांनी कशी साथ दिली ते व्हायरल व्हिडीओतून (Video) एकदा तुम्हीसुद्धा नक्की बघा…

व्हिडीओ नक्की बघा…

व्हायरल व्हिडीओत (Video) तुम्ही पाहिले असेल की, इन्स्टाग्राम युजर वैष्णवी श्रीवास्तवने तिच्या घरातील एक सुंदर क्षण कॅप्चर केला आहे. काही दिवसांपूर्वी तिने या दोन पाळीव श्वानांना आपल्या घरी आणले होते. घरात श्वानांना आणण्यापूर्वी बऱ्याच कुटुंबातील सदस्यांबरोबर तिच्या आजीचासुद्धा विरोध होता. पण, आता आजीनेसुद्धा पाळीव प्राण्यांना आपलेसे केले आहे आणि त्यांना ती भजन ऐकवताना दिसली आहे. आजी टाळ्या वाजवत भजन ऐकवते आहे आणि दोन्ही श्वानही अगदी शांतपणे भजन ऐकताना दिसत आहेत.

किती संयम ठेवून दोन्ही श्वान भजन ऐकत आहेत…

सोशल मीडियावर व्हायरल होणारा हा व्हिडीओ (Video) @paaaani.puri या इन्स्टाग्राम अकाउंटवरून शेअर करण्यात आला आहे. ‘आजीला तिचे शांतपणे भजन ऐकणारे प्रेक्षक भेटले आहेत, असे दिसते आहे’, अशी कॅप्शन देण्यात आली आहे. व्हिडीओ पाहून नेटकरी हे खास दृश्य पाहून थक्क झाले आहेत. किती संयम ठेवून दोन्ही श्वान आजीचे भजन ऐकत आहेत, किती छान, हा व्हिडीओ बघून मन प्रसन्न झाले, अरे मन जिंकलंस’ आदी अनेकविध कमेंट्स नेटकऱ्यांनी केलेल्या तुम्हाला व्हिडीओखाली दिसून येतील.

मराठीतील सर्व ट्रेंडिंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Viral video shows two pet dogs join grandmas bhajan and listen her carefully asp