Viral Video: काही लहान मुलांना त्यांच्या बालपणापासूनच आपली आवडती कला कोणती, छंद कोणते हे कळतं; त्यामुळे ते लहानपणापासूनच त्या क्षेत्रात जाण्यासाठी मेहनत घेतात. सोशल मीडियावरही अशा चिमुकल्यांचे सुंदर व्हिडीओ आपल्याला पाहायला मिळतात, ज्यात कधी कोणी सुंदर डान्स करताना दिसतं, तर कधी कोणी सुमधुर आवाजात गाणं गाताना दिसतं. सध्या एका चिमुकलीचा एक व्हिडीओ खूप व्हायरल होतोय, ज्यात ती खूप सुंदर डान्स करताना दिसत आहे.
सध्या पावसाळा सुरू झाला आहे. सगळीकडे निसर्गरम्य वातावरणही आहे. अनेकांना पावसाळ्याचा हंगाम आणि त्यात भिजायला खूप आवडते. सोशल मीडियावरही पावसात भिजण्याचा आनंद लुटणाऱ्या अनेकांचे व्हिडीओ व्हायरल होत आहेत. अशातच एका चिमुकलीचा पावसात नाचतानाचा व्हिडीओ समोर आला आहे. त्या व्हिडीओमध्ये ती चिमुकली पावसात भिजण्याचा मनसोक्त आनंद लुटताना दिसतेय.
या व्हायरल व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता की, एक चिमुकली पावसात घराच्या टेरेसवर गुलाबी रंगाची साडी नेसून ‘टिप टिप बरसा पाणी’ या हिंदी गाण्यावर डान्स करताना दिसत आहे. तिच्या डान्समधील सुंदर स्टेप्स आणि चेहऱ्यावरील भन्नाट एक्स्प्रेशन्स सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.
पाहा व्हिडीओ:
हा व्हिडीओ इन्स्टाग्रामवरील @navyaneerja2 या अकाउंटवरून शेअर करण्यात आला आहे. त्यावर आतापर्यंत पाच लाखांहून अधिक व्ह्युज मिळाल्या असून, आतापर्यंत अनेक लाइक्सही मिळाले आहेत. तसेच यावर अनेक नेटकरी कमेंट्स करताना दिसत आहेत. त्यावर एकानं लिहिलंय, “खूप छान नाचली मोठी होऊन खूप मोठी डान्सर होईल”. तर दुसऱ्यानं लिहिलंय, “एकदम कडक डान्स”. तिसऱ्यानं लिहिलंय, “एकदम भारी नाचली”.