Viral Video: समाजमाध्यमांवर अनेक चांगल्या-वाईट घटनांचे व्हिडीओ आपल्या नजरेस पडतात, ज्यातील काही व्हिडीओ निरर्थक विषयांवर आधारित असतात, ज्याला व्ह्युज लाखो असल्या तरीही त्यातून शिकण्यासारखे किंवा मनोरंजन होईल असे काहीच नसते. पण, अनेक युजर्स असेही असतात, जे सोशल मीडियावर उत्तम दर्जाचे कंटेंट शेअर करतात. त्यात सुंदर डान्स, संगीत, रेसिपी, लेखन अशा विविध गोष्टी आपल्याला पाहायला किंवा वाचायला मिळतात. सध्या असाच एक व्हिडीओ खूप व्हायरल होतोय, जो पाहून तुम्हीही कौतुक कराल.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

अनेक लहान मुलांना त्यांच्या बालपणापासूनच आपली आवडती कला कोणती, छंद कोणते हे कळतं; त्यामुळे ते लहानपणापासूनच त्या क्षेत्रात जाण्यासाठी मेहनत घेतात. सोशल मीडियावरही अशा चिमुकल्यांचे सुंदर व्हिडीओ आपल्याला पाहायला मिळतात, ज्यात कधी कोणी सुंदर डान्स करताना दिसतं, तर कधी कोणी सुमधुर आवाजात गाणं गाताना दिसतं. त्याशिवाय अनेक जण अभिनयही करताना दिसतात. सध्या एका चिमुकलीचा एक व्हिडीओ खूप व्हायरल होतोय, ज्यात ती खूप सुंदर डान्स करताना दिसत आहे.

या व्हायरल व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता की, एक चिमुकली बॉलीवूडमधील ‘मैं करूं तो साला कैरेक्टर ढीला’, या गाण्यावर डान्स करताना दिसत आहे. यावेळी ती करत असलेल्या डान्स स्टेप्स आणि चेहऱ्यावरील हावभाव अनेकांचे लक्ष वेधून घेत आहेत. चिमुकलीचा हा डान्स सोशल मीडियावर खूप व्हायरल होत आहे.

पाहा व्हिडीओ:

हा व्हिडीओ इन्स्टाग्रामवरील @kathashinde या अकाउंटवरून शेअर करण्यात आला असून, त्यावर आतापर्यंत जवळपास तीन दशलक्षांहून अधिक व्ह्युज आणि हजारो लाइक्सही मिळाल्या आहेत. त्यावर नेटकरीदेखील अनेक कमेंट्स करताना दिसत आहेत.

ज्यात एका युजरने लिहिलेय, “खूप सुंदर डान्स”. तर दुसऱ्याने लिहिलेय, “जबरदस्त डान्स” तिसऱ्या एकाने लिहिलेय, “खूप गोड डान्स करतेय.” तर आणखी एकाने लिहिलेय, “खरतनाक डान्स”.

मराठीतील सर्व ट्रेंडिंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Viral video small girl dance on main karun to sala character dheela hai song sap