Viral Video: शिक्षक म्हणजे अशी एक व्यक्ती, जी विद्यार्थ्याला विशिष्ट मार्गाने प्रेरित करून त्यांचे जीवन घडवत असते. शिक्षक मुलांना केवळ पुस्तकी ज्ञान देत नाही तर समाजात कसं राहायचं, कसं वागायचं, कसं बोलायचं याचे ज्ञान देत असतात. त्यामुळे विद्यार्थ्यांच्या जीवनात शिक्षकांचे खूप महत्त्व आहे. तर आज सोशल मीडियावर शिक्षक आणि विद्यार्थ्यांच्या नात्याचा एक हृदयस्पर्शी व्हिडीओ व्हायरल होत आहे. या व्हिडीओत विद्यार्थ्याने शिक्षकाला एक खास सरप्राईज दिलं आहे.

व्हायरल व्हिडीओ कॉलेजचा आहे. वर्गातील एक विद्यार्थी शिक्षकांना भेटवस्तू देतो. या वहीवर शिक्षकाचे चित्र असते. पण, शिक्षकांना वाटते की, ही झेरॉक्स काढण्यात आलेली आहे. पण, नंतर विद्यार्थी त्यांना सांगतो की, ही झेरॉक्स नाही तर तुमचे काढलेले स्केच आहे. हे ऐकताच शिक्षकाचा आनंद गगनात मावत नाही. शिक्षकाने स्वतःचे स्केच पाहून दिलेल्या प्रतिक्रिया एकदा व्हायरल व्हिडीओतून तुम्हीसुद्धा पाहा.

हेही वाचा…तरुणाची बॅडमिंटन खेळण्याची अनोखी स्टाईल; हातात घेतला झाडू अन्… व्हायरल VIDEO पाहून नेटकरीही थक्क…

व्हिडीओ नक्की बघा :

व्हिडीओत सुरुवातीला विद्यार्थी शिक्षकाला भेटवस्तू देतो. त्यानंतर विद्यार्थ्याने काढलेल्या शिक्षकाच्या स्केचची झलक आणि मग नंतर शिक्षकाची प्रतिक्रिया दाखवण्यात आली आहे. तुम्ही व्हिडीओत पाहिलं असेल की , विद्यार्थ्याने शिक्षकाची हुडी (कपडे) , चष्मा, दाढी या सर्व गोष्टी बारकाईने लक्षात घेऊन त्यांचे हुबेहूब चित्र रेखाटले आहे; जे पाहून शिक्षकांनाही डोळ्यांवर विश्वास बसत नाहीये.

शिक्षकाने विद्यार्थ्याचे कौतुक करत… ‘सुपर रे (Super Re) तू एक कलाकार आहेस’ ; असे म्हणताना दिसत आहेत. या कलाकाराचे चंद्रकांत कुमार असे नाव आहे. तसेच हा तरुण सेंट झेवियर्स कॉलेजचा विद्यार्थी आहे. सोशल मीडियावर हा व्हिडीओ या युजरच्या @art_by__ck या इन्स्टाग्राम अकाउंटवरून शेअर करण्यात आला आहे. ‘माझ्या शिक्षकाची अनोखी रिॲक्शन’; अशी कॅप्शनसुद्धा त्यानी या व्हिडीओला दिली आहे.