Viral Video: लावणी नृत्य ही महाराष्ट्राची लोककला आहे. लावणी नृत्य वाटते तितके सोपे नाही. लावणी करण्यासाठी नृत्याची जाण तर लागतेच; पण त्या लावणीमध्ये एक ठसकेबाजपणा, नजाकत असावी लागते. हल्ली सोशल मीडियामुळे एकापेक्षा एक लावणी सादर करणाऱ्या कलाकारांचे अनेक व्हिडीओ रोज सोशल मीडियावर व्हायरल होत असतात. पण, त्यातील काही मोजक्याच व्हिडीओंतील नृत्याच्या मोहिनीने प्रेक्षक वेडे होतात. आताही असाच एक सुंदर व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
सोशल मीडियावर विविध विषयांवर आधारित व्हिडीओ व्हायरल होत असतात, ज्यात कधी समारंभाचे व्हिडीओ, लग्नाचे व्हिडीओ तर कधी नृत्याचे व्हिडीओ पाहायला मिळतात. परंतु, त्यातील काही मोजकेच व्हिडीओ सोशल मीडियावर चर्चेत येतात. आता असाच एक व्हिडीओ खूप चर्चेत आलाय. ज्यात एक तरुणी खूप सुंदर लावणी करताना दिसतेय.
या व्हायरल व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता की, एक तरुणी मराठमोळ्या लूकमध्ये लावणी सादर करीत आहे. ती तरुणी ‘चंद्रा’ या गाण्यावर सुंदर नृत्य सादर करताना दिसतेय. तिच्या चेहऱ्यावरील सुंदर हावभाव आणि लावणी स्टेप्स पाहून नेटकरीही घायाळ झाले आहेत.
पाहा व्हिडीओ
हा व्हिडीओ @jasmin_sheikhh या इन्स्टाग्राम अकाउंटवरून शेअर करण्यात आला असून, त्या व्हिडीओला आतापर्यंत तीन लाखांहून अधिक व्ह्युज अन् हजारो लाइक्स मिळाल्या आहेत. तसेच अनेक युजर्स या व्हिडीओवर कमेंट्सही करताना दिसत आहेत. एका युजरने लिहिलंय, “काय नाचते राव ही.” एका युजरने लिहिलेय, “पोरी, तू खल्लास केलंस.” आणखी एका युजरने लिहिलेय, “हिचा डान्स मला नेहमीच आवडतो.”