Viral Video: सोशल मीडियावर जंगलातील दृश्यांचे अनेक व्हिडीओ व्हायरल होत असतात. हे व्हिडीओ आपल्यासाठी केवळ एक थरारक घटना दाखविणारा क्षण असला तरीही तो शिकार करणाऱ्या आणि शिकार झालेल्या प्राण्यांच्या आयुष्यातील सर्वांत मोठी घटना असते. खरे तर माणसांप्रमाणेच प्राणीदेखील आपली भूक भागविण्यासाठी काही ना काहीतरी करतात. अनेकदा जंगलातील वाघ, सिंह, बिबट्या यांसारखे प्राणीदेखील भूक मिटविण्यासाठी दुसऱ्या प्राण्यांची शिकार करतानाचे व्हिडीओ सोशल मीडियावर पाहायला मिळतात. तर, इतर प्राणी प्रत्येक दिवस जगताना मरणाची भीती बाळगून जगतात.

समाजमाध्यमांवर सतत प्राण्यांचे विविध व्हिडीओ व्हायरल होत असतात; ज्यात अनेकदा प्राण्यांचे मजेशीर, तर कधी थरारक व्हिडीओ पाहायला मिळतात. हे व्हिडीओ काही क्षणांत लाखो व्ह्युज मिळवतात. त्यातील काही व्हिडीओ पाहून आपल्या अंगावर काटा येतो. सध्या असाच एक व्हिडीओ पाहायला मिळत आहे; ज्यात एका वाघाने हरणावर झडप घालण्याचा प्रयत्न करताना दिसतोय.

या व्हायरल व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता, एका जंगलामध्ये शिकारीच्या शोधात असणाऱ्या वाघाला एक हरिण दिसते. यावेळी वाघ हरणाचा जीव तोडून पाठलाग करतो. हरिणही प्रचंड चपळ असल्यामुळे जीवाच्या आकांताने धावतो आणि वाघापासून दूर जाऊन स्वतःचे प्राण वाचवतो.

पाहा व्हिडीओ:

हा व्हिडीओ युट्यूबवरील @WildernessofIndia या अकाउंटवरून शेअर करण्यात आला आहे आणि त्यावर आतापर्यंत जवळपास लाखो व्ह्युज आणि अनेक लाइक्सही मिळाल्या आहेत. त्याशिवाय यावर अनेक नेटकरीदेखील कमेंट्स करताना दिसत आहेत. एकाने लिहिलेय, “हरणाने पुन्हा मागे वळून पाहिलेच नाही” दुसऱ्याने लिहिलेय, “शेवटी हरण वाचले” तिसऱ्याने लिहिलेय, “वाघ निराश झाला”