Viral Video: सध्या लग्नसराईचे दिवस सुरू असून समाजमाध्यांवर लग्नातील हटके रील्स, व्हिडीओ आणि फोटो सतत व्हायरल होत असतात. या व्हायरल होणाऱ्या व्हिडीओंमध्ये लग्नातील अनेक गमतीजमती, अनोख्या प्रथा, हटके उखाणे शिवाय वधू-वराच्या नात्यातीस खास बॉण्डिंगही आपल्याला पाहायला मिळतं. सध्या असाच एक सुंदर व्हिडीओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे, जो पाहून तुम्हीही कौतुक कराल.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

आपल्यावर मनापासून प्रेम करणारा, आपली सगळी स्वप्नं पूर्ण करणारा, आपली काळजी घेणारा नवरा मिळावा असं प्रत्येक मुलीचं स्वप्न असतं. जो स्वतःआधी तिच्या प्रत्येक गोष्टीचा विचार करेल. तिच्या मनातील भावना ओळखून तिला नेहमी सुखात ठेवेल. या सर्व इच्छा पूर्ण करणारा जोडीदार अनेक मुलींच्या नशिबात असतो. आता व्हायरल होत असलेल्या व्हिडीओमध्ये असंच काही पाहायला मिळत आहे, जे पाहून नेटकरीही वराचे कौतुक करताना दिसत आहेत.

असं म्हणतात, वधू-वराचे ३६ गुण मिळो न मिळो पण त्यांचं बॉण्डिंग चांगलं असायला हवं; तरंच दोघांचा संसार सुखाचा होतो. सोशल मीडियावर पती-पत्नीच्या नात्यातील हे बॉण्डिंग दाखवणारे अनेक व्हिडीओ खूप व्हायरल होत असतात. आताही असाच एक व्हिडीओ सोशल माडियावर चर्चेत आला आहे.

पाहा व्हिडीओ

या व्हायरल व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता, एका साखरपुड्याच्या कार्यक्रमामध्ये वधू आणि वर एकमेकांच्या बाजूला बसले असून यावेळी एक महिला त्यांना कट केलेला केक भरवण्यासाठी येते. यावेळी वराला ती घास भरवणार इतक्यात तो त्याच्या डोळ्यांनी नाही अशी खूण करून केक आधी वधूला भरवण्यास सांगतो आणि वधूने केक खाल्ल्यानंतर स्वतः केक खातो. वराने आपल्या पत्नीवरील दाखवलेले हे प्रेम पाहून नेटकरी अनेक कमेंट्स करताना दिसत आहेत.

हा व्हिडीओ इन्स्टाग्रामवरील @imanuragsingh या अकाउंटवर शेअर करण्यात आला असून यावर आतापर्यंत ५१ मिलियनहून अधिक व्ह्युज मिळाल्या असून यावर सात लाखांहून अधिक लाइक्स मिळाल्या आहेत. तसेच यावर अनेक युजर्स कमेंट्स करताना दिसत आहेत. या व्हिडीओवर एका युजरने लिहिलंय की, “असा जोडीदार हवा”, तर दुसऱ्याने लिहिलंय की, “खरंच दोघांमध्ये खूप प्रेम आहे”, तर तिसऱ्या युजरने लिहिलंय की, “किती गोड.”

मराठीतील सर्व ट्रेंडिंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Viral video weeding video wife husbands first priority sap