Viral Video : सोशल मीडियामुळे नेहमीच आपल्याला विविध गोष्टी पाहायला मिळतात, ज्यामध्ये अनेकदा जंगलातील प्राण्यांचे व्हिडीओदेखील व्हायरल झालेले असतात. त्यामध्ये कधी वाघ, बिबट्या यांसारखे हिंस्र प्राणी एखाद्या प्राण्याची शिकार करताना दिसतात; तर काही प्राण्यांमध्ये भांडण वा मैत्री झाल्याचे पाहायला मिळते. प्राण्यांचे असे व्हिडीओ नेहमीच युजर्सचे लक्ष वेधून घेतात. आतादेखील असाच एक व्हिडीओ खूप व्हायरल होतोय, जो पाहून तुम्हीदेखील काही क्षण अवाक् व्हाल.

माणसांच्या आयुष्यात जसा जगण्यासाठी संघर्ष सुरू असतो, तसाच संघर्ष प्राण्यांच्या आयुष्यातही पाहायला मिळतो. जंगलातील वाघ, सिंह, बिबट्या यांसारखे प्राणीदेखील भूक मिटविण्यासाठी एखाद्या प्राण्याची शिकार करताना दिसतात. त्यासाठी ते वापरत असलेले डावपेच आपल्या काळजाचा ठोका चुकवणारे असतात. सध्या असाच एक व्हिडीओ व्हायरल होतोय, ज्यात वाइल्डबीस्टवर जंगली कुत्र्यांचा कळप हल्ला करताना दिसत आहे.

या व्हायरल व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता की, एका गवताळ प्रदेशामध्ये जंगली कुत्र्यांच्या कळपाला वाइल्डबीस्ट दिसतो. मग ते वाइल्डबीस्टवर हल्ला करण्यासाठी जीवाच्या आकांताने त्याचा पाठलाग करतात. त्याच वेळी जीव वाचवण्यासाठी वाइल्डबीस्टही जीव तोडून धावतो. बराच वेळ पाठलाग केल्यानंतर अखेर जंगली कुत्र्यांचा कळप वाइल्डबीस्टवर हल्ला करतो. तो धडकी भरवणारा व्हिडीओ सोशल मीडियावर खूप व्हायरल होत आहे.

हा व्हिडीओ यूट्यूबवरील @BBC या अकाउंटवरून शेअर करण्यात आला असून, त्या व्हिडीओला आतापर्यंत लाखो व्ह्युज आणि हजारो लाइक्स मिळाल्या आहेत. त्यावर युजर्सदेखील अनेक कमेंट्स करताना दिसत आहेत.

पाहा व्हिडीओ:

हेही वाचा
VIDEO: “म्हणून कोणाला कमी समजू नका…”, हरणांची शिकार करण्यासाठी जंगली कुत्र्यांच्या टोळीने आखला डावपेच; पण शेवटी कोण पडलं कुणावर भारी?

एका युजरने लिहिलेय, “अरे वा! त्या कुत्र्यांमध्ये किती सहनशक्ती आहे, किती छान टीमवर्क आहे.” दुसऱ्याने लिहिलेय, “हे दृश्य पाहून अंगावर काटा आला.” तिसऱ्याने लिहिलेय, “खूपच भयानक.”