Viral Video Today: आजवर आपण अनेक रिऍलिटी टॅलेंट शो मध्ये अनेक स्पर्धक आपल्या शरीराची लवचिकता दाखवत असल्याचे पाहिले असेल. कधी कधी तर या मंडळींना बघून यांच्या शरीरात हाडं आहेत की नाही असा प्रश्नच पडतो. एकदा कपिल शर्माच्या शोमध्ये अभिनेत्री आलिया भट हिनेसुद्धा आपल्या हाताची लवचिकता दाखवून अनेकांना थक्क केलं होतं, आता अलीकडेच असाच एका कमाल फ्लेक्सिबल तरुणीचा व्हिडीओ व्हायरल होत आहे, आश्चर्य म्हणजे हात,पाय, कंबरेची लवचिकता नाही तर या तरुणीने स्वतःच्या नाकाची हालचाल करून अनेकांना थक्क केले आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

इंटरनेटवर एक व्हिडिओ व्हायरल होत आहे ज्यामध्ये महिलेने नाकाची लवचिकता दाखवली आहे. नेदरलँड्समधील रोमाना ब्रुंटजेस ही तरुणीला जन्मतःच नाकाचे हाड नव्हते. अलीकडेच तिने आपल्या या हाड नसलेल्या नाकाने काही कर्तब करून दाखवले. इंस्टाग्रामवर शेअर करण्यात आलेला हा व्हिडीओ पाहून अनेकांना स्वतःच्या डोळ्यावर विश्वासच बसत नाही आहे. रोमाना हि या व्हिडिओमध्ये आपल्या बोटाने नाक दाबते आणि आश्चर्य म्हणजे नाकाला हाड नसल्याने तिचं नाक पूर्ण सपाट होतं.

इंस्टाग्रामवर व्हिडीओ शेअर करतानाच रोमानाने तुमच्या नाकाला हाड आहे का? असं कॅप्शन दिलं होतं. रोमानाने वापरलेले हॅशटॅग वाचूनही तुम्हाला नक्कीच हसू आवरणार नाही. नाकाची लवचिकता दाखवणाऱ्या या व्हिडिओला सुद्धा १ मिलियन व्ह्यूज आहेत. तुम्ही स्वतः पाहा.

अन तिचं नाक पूर्ण सपाट झालं..

Video: लग्नात लाल साडी नेसून रेखा यांचा भन्नाट भांगडा; चेहऱ्यावरचा ‘तो’ एक भाव पाहून नेटकरी फिदा

रोमानाचा व्हिडीओ पाहून अनेकांनी मजेशीर प्रतिक्रिया दिल्या आहेत. तुझी मज्जा आहे, तू जेव्हा चुकून काचेच्या दरवाजावर आदळत असशील तेव्हा तुला अजिबात दुखत नसेल ना? असा प्रश्न काहींनी केला आहे तर मुळात नाकाला हाडाची गरजच नाही असे म्हणत काहींनी आपल्यालाही रोमानासारखंच लवचिक नाक हवं अशी इच्छा व्यक्त केली आहे. रोमाना आपल्या इंस्टाग्राम अकाउंटवर अनेकदा लवचिक नाकाशी संबंधित व्हिडीओ पोस्ट करतअसते विशेषतः तिचे मेकअप व्हिडीओ चाहत्यांना प्रचंड आवडतात.

मराठीतील सर्व ट्रेंडिंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Viral video woman born without nose bone shows amazing flexibility netizens in aww shocking clips svs